चित्रपट निर्माते बोनी कपूर यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली आहे. बोनी कपूर यांनी इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे ज्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांना फुलांचा गुच्छ भेट दिली आहे. हा फोटो शेअर करताना बोनी कपूर यांनी लिहिले आहे की, ‘उत्तर प्रदेशचे माननीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी यांच्याशी फलदायी बैठक झाली.’
अधिकाऱ्यांनी सांगितले की, अलीकडेच, बोनी कपूर यांच्या कंपनी, बेव्ह्यू प्रोजेक्ट्स एलएलपीने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या स्वप्नातील प्रकल्प ‘इंटरनॅशनल फिल्म सिटी’चा सविस्तर लेआउट प्लॅन यमुना एक्सप्रेसवे औद्योगिक विकास प्राधिकरण (YEIDA) ला सादर केला आहे.
YEIDA ने जारी केलेल्या प्रेस नोटनुसार, YEIDA आता योजनेचा आढावा घेईल आणि मंजुरीनंतर फिल्म सिटीचे काम सुरू होईल. यमुना एक्सप्रेसवेच्या बाजूने सेक्टर-२१ मध्ये १,००० एकरपेक्षा जास्त जमिनीवर आंतरराष्ट्रीय फिल्म सिटी बांधण्याची योजना आहे. त्याचा पहिला टप्पा २३० एकर जमिनीवर सुरू होईल, ज्याची किंमत सुमारे १,५१० कोटी रुपये आहे.
सीईओ अरुण वीर सिंग म्हणाले की, बोनी कपूर यांच्या कंपनीने या प्रकल्पासाठी सर्वाधिक बोली लावली आहे. त्यांना १८ टक्के महसूल वाटा देऊन मंजुरी देण्यात आली आहे.पुढील आठ वर्षांत हा प्रकल्प तीन टप्प्यात पूर्ण केला जाईल. पहिल्या टप्प्यात २३० एकरवर बांधकाम केले जाईल. त्यानंतर उर्वरित ७७० एकरवर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात काम केले जाईल.
पहिल्या १५५ एकरचा वापर चित्रपट स्टुडिओ, ध्वनी स्टेज, पोस्ट-प्रॉडक्शन युनिट्स आणि चित्रपट संस्था बांधण्यासाठी केला जाईल. याशिवाय, ७५ एकर कार्यालये आणि मनोरंजन संकुल म्हणून विकसित केले जाईल.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
‘मां’ चं ओपनिंग हाेणार खतरनाक ! साेनाक्षी बाजूला, काजाेलचा जलवा









