Tuesday, January 27, 2026
Home बॉलीवूड गायक आतिफ असलम याच्या वडिलांचे निधन; ७७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…

गायक आतिफ असलम याच्या वडिलांचे निधन; ७७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक आतिफ असलम याचे वडील मोहम्मद असलम याचे बुधवार, १३ ऑगस्ट रोजी निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. आतिफ असलम याने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे त्याच्या वडिलांच्या निधनाची माहिती दिली. त्याने पोस्टमध्ये त्यांच्या वडिलांचा फोटो शेअर केला आणि एक भावनिक पोस्ट लिहिली.

स्वतःचा आणि त्याच्या वडिलांचा फोटो शेअर करून आतिफ असलम याने पोस्टमध्ये लिहिले आहे, ‘आमच्या आयर्न मॅनला शेवटचा सलाम. तुम्ही जिथे असाल तिथे प्रेमाने जगा, अब्बू जी.’ आतिफ असलम त्यांच्या वडिलांना आयर्न मॅन म्हणत असे. पाकिस्तानी माध्यमांनुसार, आतिफ असलम याने त्याच्या चाहत्यांना त्यांच्या प्रार्थनेत त्यांची आठवण ठेवण्याची विनंती केली आहे.

वृत्तानुसार, मोहम्मद अस्लम बऱ्याच काळापासून आजारी होते. काही महिन्यांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता.असरच्या नमाजानंतर मोहम्मद अस्लम यांना लाहोरमधील स्मशानभूमीत दफन करण्यात येईल.आतिफ अस्लमच्या वडिलांच्या निधनावर अनेक पाकिस्तानी कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा  

भूषण पाटीलच्या ‘कढीपत्ता’ चित्रपटात अनोखी प्रेमकहाणी; ७ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित

हे देखील वाचा