Wednesday, February 5, 2025
Home भोजपूरी अरे भारीच ना! ‘ट्रेंडिंग गर्ल’ नीलमचे गाणे रिलीझ होताच व्हायरल; अभिनेत्रीच्या डान्सने प्रेक्षकांना भुरळ

अरे भारीच ना! ‘ट्रेंडिंग गर्ल’ नीलमचे गाणे रिलीझ होताच व्हायरल; अभिनेत्रीच्या डान्सने प्रेक्षकांना भुरळ

भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये अनेक सुपरहिट गाणी उदयास येत आहेत. अनेक गाण्यांनी चाहत्यांना वेड लावले आहे. यामध्ये आता आणखी एका गाण्याचा समावेश झाला आहे, ज्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. भोजपुरी इंडस्ट्रीची सुप्रसिद्ध गायिका शिल्पी राज आणि ट्रेंडिंग गर्ल नीलम गिरी यांचे ‘बदरवा’ हे गाणं नुकताच प्रदर्शित झाले आहे. प्रदर्शित होताच हे गाणं मोठा धमाका करत आहेत. नीलम गिरीचे हे पावसाचे विशेष गाणे यूट्यूबवर हिट ठरले आहे. गाण्यातील नीलम गिरीच्या डान्सने प्रेक्षकांना भुरळ घातलीय.

पावसाच्या पाण्यात भिजत तिने आपल्या अदाकारीने प्रेक्षकांना घायाळ केले आहे. हेच कारण आहे की, ज्यामुळे काही तासांतच या गाण्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. आतापर्यंत जवळजवळ ८ लाखांपेक्षा जास्त लोकांनी हे गाणं पाहिलं आहे. हे गाणं भोजपुरी रेकॉर्ड्स वर्ल्डवाईडच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आले आहे. या आनंददायी पावसाळ्याच्या वातावरणात हे गाणे अजूनच आकर्षित करत आहे. (Well known singer Shilpi Raj and trending girl Neelam Giri set fire to Bhojpuri industry with the song ‘Badarwa’)

हा व्हिडिओ पाहून असे वाटते की, ‘बदरवा’ हे गाणे पाण्यामध्ये आग लावण्याचे काम करत आहे. काळ्या आणि लाल रंगाच्या वेशभूषेत नीलम गिरी खूपच सुंदर दिसत आहे. त्याचबरोबर तिची सुंदरता अजून फुलवण्यासाठी पावसाची देखील त्यात भर पडली आहे. इंडस्ट्रीमध्ये ट्रेंडिंग सिंगर म्हणून प्रसिद्ध झालेली गायिका शिल्पी राज हिने तिच्या खास शैलीत हे गाणं गायले आहे. हे गाणे प्रदर्शित होताच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे.

वर्ल्डवाईड रेकॉर्ड्स प्रस्तुत ‘ बरदवा’ या गाण्याची गायिका शिल्पी राज आहे, तर या गाण्याची निर्मिती रत्नाकर कुमारने केली आहे. याचे गीतकार विजय चौहान आहेत आणि संगीतकार आर्या शर्मा आहेत. तसेच याचे दिग्दर्शन आर्यन देव, नृत्यदिग्दर्शक सम्राट अशोक, संपादक मीटजी, डीओपी राजेश राठोड आणि रवी राठोड आहेत. निर्मिती प्रमुख पंकज सोनी आहेत.

या गाण्यावरून असे दिसून येते की, जेव्हा शिल्पी राज आणि नीलम गिरी दोघे एकत्र येतात, तेव्हा भोजपुरी इंडस्ट्रीत नुसता धुमाकूळ होतो. या जोडीची आतापर्यंतची सर्व गाणी मिलेनियम क्लबमध्ये सामील झाली आहेत. अलीकडेच, नीलम गिरी आणि शिल्पी यांचे आणखी ‘केबल होई लाइका दुसरका’ आणि ‘गरैया माचरी’ ही गाणी देखील प्रदर्शनासह व्हायरल झाले. दोन्ही गाण्यांना लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर नीलम गिरी आणि लोकप्रिय गायिका शिल्पी राज यांचे ‘काबा लाइका होई दुसरका?’ या गाण्याच्या व्हिडिओ देखील सध्या ट्रेंड करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-पुरुष कलाकारांना जास्त फी मिळण्यावर बोलल्या नीना गुप्ता; म्हणाल्या, ‘पुरुषांच्या या जगात स्त्रियांना…’

-‘बिग बॉस’च्या घराबाहेर राखी सावंतला चावला कुत्रा; म्हणाली, ‘मी पण त्याला चावणार’

-‘पोन्नियन सेलवन’ सिनेमातील ऐश्वर्याचा फोटो लीक; अभिनेत्री दिसली ‘या’ अवतारात

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा