सोनी टीव्ही सर्वात जास्त प्रसिद्ध शोपैकी एक म्हणजेच ‘इंडियन आयडल १२’ हा होय. या शोच्या १२ व्या हंगामाचा विजेता पवनदीप राजन ठरला आहे. त्याचबरोबर या शोची पहिली रनर अप अरुणिता कांजिलाल ठरली. काही दिवसांपूर्वीच पवनदीप राजनने माध्यमासोबत बोलताना एका गोष्टीचा खुलासा केला की, त्याने मुंबईत अरुणिता कांजिलालच्या इमारतीत एक घर खरेदी केले आहे.
‘इंडियन आयडल १२’ चा हंगाम सुरू असताना अशी माहिती समोर येत होती की, पवनदीप राजन आणि अरुणिता कांजिलाल नात्यात आहेत. परंतु त्यांनी नेहमी सांगितले की, ते दोघेही चांगले मित्र आहेत. शोचा होस्ट आदित्य नारायण आणि शोचे परीक्षक देखील या दोघांना चिडवत असायचे. दोघेही हसताना दिसले होते. याशिवाय चाहत्यांनी शोच्या निर्मात्यांना बनावट लव्ह एँगलबद्दल ही फटकारले होते. परंतु निर्मात्यांनी यात कोणताही बदल केला नाही. त्यामुळे दोघेही डेटिंगच्या बाबतीत टिकून राहिले. आता अशी बातमी आली आहे की, पवनदीप आणि अरुणिता यांनी एका इमारतीत घर खरेदी केले आहे. (What do you say Pawandeep Rajan took a house in Arunita Kanjilal’s building)
काही दिवसांपूर्वी पवनदीपने एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याने मुंबईत घर विकत घेतले आहे आणि तो त्याच इमारतीत आहे जिथे अरुणिता कांजिलालनेही फ्लॅट खरेदी केला आहे. त्यांच्या गाण्याच्या टिझर लाँचवेळी पवनदीप राजनने घर खरेदी करण्याच्या गोष्टीचा स्वीकार केला होता.
आता मोहम्मद दानिश म्हणाला की, “पवनदीप राजन आणि अरुणिता कांजिलाल यांनी मुंबईतील एकाच इमारतीत घर खरेदी केले आहे. पवनदीप आणि अरुणिता व्यतिरिक्त, आम्हीही त्याच इमारतीत घर घेण्याच्या विचारात आहोत. जेणेकरून आम्ही तेथे एक स्टुडिओ उभा करू शकू आणि आम्हाला एकत्र संगीत बनवता येईल. आमच्या सर्वांचा प्लॅन आहे, आम्ही एकत्र राहण्याचा. सर्व लोक एकाच इमारतीत एकत्र राहतील. आमची मैत्री कधीच तुटणार नाही. आपण सगळे बाहेरून आलो आहोत. जसे कोणी उत्तराखंडहून आले आहे, तर कोणी राजस्थानहून आले आहे. म्हणूनच सर्वजण एकत्र घर घेण्याचा प्लॅन सुरू आहे. ही आमची फक्त मैत्री नाही हे आमचं एक कुटुंब आहे.”
या शोबद्दल बोलायचे झाले, तर पवनदीप राजनने पहिले, अरुणिता कांजीलालने दुसरे, तर सायली जाधवने तिसरे स्थान पटकावले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-बिकिनी परिधान करून ज्यूस काढताना दिसली जान्हवी कपूर; मजेशीर व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट
-जेव्हा गाणे गाताना अचानक ओरडली मिताली, पाहुन सिद्धार्थही झाला स्तब्ध; मग पुढे…