Wednesday, June 26, 2024

प्रेमासाठी खूप काही केलं पण बहुतेक लक्षातच नाही आलं.! रेखा यांनी ‘अमिताभ’करिता थेट चित्रपटांचे शेड्युल बदललं, पण…

हिंदी सिने जगतातील अतिशय गाजलेले आणि प्रसिद्ध असे प्रेम प्रकरण म्हणजे अमिताभ आणि रेखा. वृत्तपत्र आणि मासिकांमधून पानं पानं भरून भरून त्यांच्या विषयी लेख यायचे. फक्त बॉलीवूडच नाहीतर सामान्य लोकांनाही त्यांच्या बद्दल माहित झाले होते. रेखा यांचे जीवन चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल असे होते.

एक काळ होता, जेव्हा रेखा अमिताभ यांच्यासाठी चित्रपटांच्या शूटिंगच्या वेळेतही बदल करण्याची विनंती निर्माते, दिग्दर्शकांना करत. असाच एक किस्सा घडला होता. तेव्हा अभिनेते रणजित हे त्यांच्या खलनायकी भूमिकांसाठी खूपच प्रसिद्ध होते. त्यांनी रेखा आणि धर्मेंद्र यांना घेऊन चित्रपट काढायचे ठरवले. त्या सिनेमाचे नाव होते ‘कारनामा’.

या चित्रपटासाठी रेखा आणि धर्मेंद्र या दोघांनीही होकार दिला होता. जशी शूटिंग सुरु झाली तसे रेखा यांनी रणजित यांना शूटिंगचा संध्याकाळचा वेळ बदलून सकाळचा ठेवावा अशी विनंती केली. त्यासाठी त्यांनी ‘मला संध्याकाळी अमिताभ यांना भेटून यांच्यासोबत वेळ घालवायचा असतो.’ असे कारण दिले.

रेखा त्या चित्रपटात मुख्य भूमिकेत असल्याने रणजित यांनी नाइलाजाने त्यांची ही विनंती मान्य केली. मात्र तरीही रणजित हहा चित्रपटासाठी खूप काळजीत होते. शूटिंगचा वेळ बदल्याने धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या चित्रपटांच्या शेड्युलवरही त्याचा परिणाम झाला. शेवटी रणजित यांनी धर्मेंद्र यांना भेटून यावर तोडगा काढण्याची विनंती केली. त्यावर त्यांनी रणजित यांना सांगितले की, ‘तुम्ही अनिता राज यांना घेऊन हा सिनेमा करा’.

रणजित यांनी नंतर विनोद खन्ना आणि अनिता राज यांना घेऊन हा चित्रपट पूर्ण केला. मात्र प्रदर्शनानंतर हा सिनेमा सपशेल फ्लॉप झाला. ही घटना स्वतः रणजित यांनी काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीच्या वेळेस सांगितली होती.

हे देखील वाचा