बॉलिवूडच्या जगात जितक्या लवकर नाती बनतात, तितक्याच लवकर ती तुटतात सुद्धा. कलाकार जेव्हा एकमेकांच्या प्रेमात पडतात, तेव्हा ते साता जन्माच्या शपथा खातात. काही जण त्यांची वचनं निभावतात. मात्र काहीजण असेही आहेत, जे छोट्या छोट्या कारणावरून नाते तोडून टाकतात. म्हणूनच अगोदर मोठ्या रूबाबात एकमेकांसोबत मिरवणारे हेच कलाकार नंतर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसतात. याच यादीत अभिनेता करण कुंद्रा आणि अभिनेत्री अनुषा दांडेकर यांचाही समावेश होतो.
करण कुंद्रा आणि अनुषा दांडेकर एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात अक्षरश: बुडालेले दिसायचे. पण आता त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्याही बऱ्याच काळापासून सोशल मीडियावर चर्चेत असतात. करण आणि अनुषाने एकमेकांना बराच काळ डेट केले. त्यानंतर या जोडप्याचे ब्रेकअप झाले. आता अलीकडेच अनुषाने करणवर निशाणा साधलेला पाहायला मिळाला. (what was reason for separating from karan kundrra anusha dandekar shared photo of dog)
अलिकडेच अनुषा दांडेकर त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे बोलली. ती म्हटली की, दोघांनीही एकमेकांसोबत खूप चांगला वेळ घालवला आहे आणि दोघांनीही नेहमीच एकमेकांच्या कुटुंबाचा आदर केला आहे.
ब्रेकअपबद्दल बोलली अभिनेत्री
अलिकडेच, अनुषाने इंस्टाग्रामवर तिच्या चाहत्यांसाठी क्वेश्चन-आंसरचं सेशन आयोजित केलं होतं. या दरम्यान तिने प्रत्येक प्रश्नाची मोकळेपणाने उत्तरे दिली आहेत. या दरम्यान अनुषाला तिच्या एका चाहत्याने विचारले की, “तुम्ही तुमच्या ब्रेकअपचे खरे कारण सांगाल का?” अनुषाने या प्रश्नाचे अतिशय अनोख्या पद्धतीने उत्तर दिले आहे.
शेअर केला कुत्राच्या फोटो
या प्रश्नाला उत्तर देत, अभिनेत्रीने आपल्या कुत्र्याबरोबरचा एक फोटो शेअर केला आणि म्हटले की, “प्रत्येकजण नात्यामध्ये अधिक प्रामाणिकपणा आणि आनंद मिळवण्यासाठी पात्र आहे आणि ही स्वतःवर प्रेम करण्याची सुरुवात आहे, म्हणून मी स्वतः निवडले आहे. हेच खरे कारण आहे.”
अनुषाचा हा खास अंदाज चाहत्यांना चांगलाच भावला आहे. चाहते या स्टाईलसाठी तिचे खूप कौतुक करत आहेत. तसेच, अनुषाच्या विधानावरून असे दिसते की, करण कुंद्राच या ब्रेकअपचे खरे कारण आहे. आता अनुषाच्या या उत्तराने करण कुंद्रा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. करण लवकरच ‘बिग बॉस १५’मध्ये दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-विक्की कौशलच्या ‘सरदार उधम’ चित्रपटाचा टीझर रिलीझ, पाहायला मिळाला अभिनेत्याचा जबरदस्त लूक