Wednesday, January 21, 2026
Home बॉलीवूड पैशांचा पाऊस पाडणार अक्षय कुमार; ‘Wheel Of Fortune’च्या ट्रेलरमध्ये उघड झाला करोडोंच्या इनामाचा खेळ

पैशांचा पाऊस पाडणार अक्षय कुमार; ‘Wheel Of Fortune’च्या ट्रेलरमध्ये उघड झाला करोडोंच्या इनामाचा खेळ

अक्षय कुमारला आपण आतापर्यंत मोठ्या पडद्यावर विविध भूमिकांत पाहिलं आहे, पण आता तो टीव्हीवरही होस्टच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय कुमारचा नवा गेम शो ‘व्हील ऑफ फॉर्च्यून’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, या शोचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमध्ये पैशांचा पाऊस पडताना दिसत असून, शोबद्दल उत्सुकता वाढली आहे.

बुधवारी रिलीज झालेल्या ट्रेलरमध्ये ‘व्हील ऑफ फॉर्च्यून’ या शोचं वेगळं आणि मनोरंजक स्वरूप स्पष्टपणे पाहायला मिळतं. या शोमध्ये स्पर्धकांना ‘किस्मतीचं चक्र’ फिरवावं लागतं. त्या चक्रावर जेवढी रक्कम येते, ती जिंकण्याची संधी मिळते. मात्र इतक्यावरच खेळ संपत नाही. चक्र फिरवल्यानंतर स्पर्धकांना एक कोडे (पझल) सोडवावं लागतं. पझल योग्यरीत्या सोडवल्यासच बक्षीस मिळतं, अन्यथा हातची संधी निसटते.

शोच्या ट्रेलरमध्ये अभिनेता रितेश देशमुख (ritesh dheshmukh)आणि त्याची पत्नी अभिनेत्री जेनेलिया डिसूजा यांचीही झलक पाहायला मिळते. एका विशेष एपिसोडमध्ये दोघंही खेळताना दिसणार आहेत. रितेशने फिरवलेलं किस्मतीचं चक्र थेट १ कोटी रुपयांवर जाऊन थांबतं, हे पाहून सगळेच थक्क होतात. मात्र रितेश प्रत्यक्षात १ कोटी रुपये जिंकतो का, याचं उत्तर शो पाहिल्यावरच मिळणार आहे.

कधी आणि कुठे पाहता येईल शो? -‘व्हील ऑफ फॉर्च्यून’ हा शो २७ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, सोनी टीव्ही आणि सोनी लिव एपवर सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता त्याचं प्रीमियर होणार आहे. ट्रेलरला मिळालेला प्रतिसाद पाहता, हा शो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्याची दाट शक्यता आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा 

बॉर्डर 2’ अ‍ॅडव्हान्स बुकिंग: रिलीजआधीच विजयाचा बिगुल, बॉक्स ऑफिसच्या लढतीत आघाडीवर; धमाकेदार ओपनिंग

हे देखील वाचा