Friday, July 5, 2024

तरुणपणी एका मुलीच्या प्रेमात वेड्या झालेल्या आमिर खानने नकार मिळताच केले होते ‘हे’ मोठे कृत्य

सध्या आमिर खान चित्रपटांपेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. अशात आमिर खानची एक जुनी मुलाखत मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे. या मुलाखतीमध्ये तो सांगतो की, किशोरवयीन वयात तो एका मुलीवर खूप प्रेम करायचा मात्र तिने त्याला नकार दिला आणि त्यानंतर त्याची अवस्था खूपच वाईट झाली. याच दुःखाच्या मनस्थिती त्याने त्याचे संपूर्ण केस काढून टाकले आणि टक्कल केले. तेव्हाच त्याचा पहिला सिनेमा ‘होली’ प्रदर्शित होणार होता. मात्र जेव्हा दिग्दर्शकांनी त्याला केस नसलेल्या अवतारात पाहिले तेव्हा त्यांना धक्का बसला.

आमिर खानने चित्रपटांमध्ये वेगवगेळ्या भूमिका साकारून प्रेक्षकांचे अमाप प्रेम मिळवले. त्याने बालकलाकार म्हणून ‘यादों की बारात’ आणि ‘मदहोश’ या चित्रपटांमध्ये काम केले. त्यानंतर मुख्य भूमिकेत त्याचा 1984 साली ‘होली’ हा सिनेमा आला. हा केतन मेहता यांचा ड्रामा सिनेमा होता. त्याकाळी खूपच चर्चा झाली की, आमिरने चित्रपटासाठी टक्कल केले. मात्र खरे काही वेगळेच होते. आमिर खानचे टक्कल पाहून केतन मेहता देखील हैराण झाले होते.

Aamir-Khan-3

आमिर म्हणाला, “खूप लोकांनी विचार केला की, मी सिनेमासाठी टक्कल केले. मात्र खरे असे अजिबातच नव्हते. मी ज्या मुलीवर प्रेम करायचो तिने मला धोका दिला होता. एक दिवस ती मला म्हणाली की तिचे माझ्यावर प्रेम नाही. याची रिऍक्शन म्हणून मी टक्कल केले होते. हे खूपच चुकीचे आणि बालिश होते.” या मुलाखतीमध्ये त्याने हे देखील सांगितले की, त्याची पहिली बायको असणाऱ्या रीना दत्ताला त्याने रक्ताने पत्र लिहिले होते. मात्र या कृतीमुळे ती खूपच अपसेट झाली होती.(when aamir khan shaved his head because of girl rejected him)

 

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘झूठा’ गाण्याच्या प्रदर्शनावेळी जोरजोरात रडली राखी सावंत म्हणाली, ‘मी संसाराची स्वप्न नाही पाहू शकत का?’

मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध निर्माते प्रदीप उप्पूर यांचे दुःखद निधन

हे देखील वाचा