बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा वर्षाच्या सुरुवातीला आई बनली. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. आता आई बनल्यानंतर तिने जवळपास अडीच महिन्यांनंतर पुन्हा एकदा आपल्या कामाची वाट धरली आहे. शूटिंगवरील तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल होत आहेत. कामावर परतताच अनुष्काचा एक जुना व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अनुष्काने ११ जानेवारीला मुलीला जन्म दिल्यानंतर ३१ मार्चला जेव्हा ती सेटवर पोहोचली, तेव्हा तिचा एक थ्रोबॅक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ती सिमी गरेवाल यांच्यासोबत चर्चा करताना दिसत आहे.
काय म्हणाली होती अनुष्का?
या चर्चेदरम्यान जेव्हा सिमी यांनी अनुष्काला विचारले होते की, लग्न तुझ्यासाठी महत्त्वाचे आहे का? यावर प्रत्युत्तर देत अनुष्का म्हणाली होती की, “हो लग्न खूप महत्त्वाचं आहे. मला लग्न करायचे आहे. मला मुलं- बाळं पाहिजेत. जेव्हा माझे लग्न लग्न होईल, तेव्हा कदाचित मी कामही नाही करणार.”
नुकतेच समोर आलेल्या फोटोंमध्ये अनुष्का आपल्या व्हॅनिटी व्हॅनमधून उतरताना दिसत आहे. या फोटोत अनुष्का पांढऱ्या रंगाच्या टॉप आणि जीन्समध्ये दिसत आहे. खरं तर अभिनेत्रीला एका जाहिरातीचे शूटिंग करताना पाहिले गेले होते. ती निश्चित वेळेच्या दोन महिन्यांपूर्वी त्या जाहिरातीच्या शूटिंगसाठी पोहोचली होती.
YAYIEEE ❤️???? Good luck Mama @AnushkaSharma ???? https://t.co/PNDbQZxWVk
— Anjali. (@ShahAnjie) March 31, 2021
अनुष्का कामावर परतल्यानंतर अनेक चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत, तर काहींनी तिला ट्रोलही केले आहे. काहीजण तिला थ्रोबॅक व्हिडिओचा संदर्भ देत असून प्रश्न विचारत आहेत.
अनुष्का शर्माच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती मोठ्या पडद्यापासून दूर आहे. ती कोणत्या चित्रपटातून पुनरागमन करेल, याबाबत कोणतीही माहिती नाहीये. ती सन २०१८ साली ‘झिरो’ या चित्रपटात शाहरुख खानसोबत दिसली होती. अभिनयाव्यतिरिक्त तिने मागील वर्षी निर्माती म्हणून ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपले पदार्पण केले होते. तिने ऍमेझॉन प्राईम व्हिडिओवरील ‘पाताल लोक’ आणि नेटफ्लिक्सवरील ‘बुलबुल’ची निर्मिती केली होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘गब्बर’ धवनसोबत थिरकली युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा, भांगडा नृत्य करत वेधले नेटकऱ्यांचे लक्ष
-‘सगळं ठीक तर आहे ना?’ म्हणत सुष्मिताच्या भावनिक पोस्टवर चाहत्यांची प्रतिक्रिया