Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

नवलंच म्हणायचं अन् काय! ‘रोमान्स किंग’ शाहरुख खानमुळे अभिनेत्रीने दिवसभर धुतले नव्हते आपले हात

बॉलिवूडचा ‘रोमान्स किंग’ शाहरुख खानला आज कोणत्याही परिचयाची गरज नाहीये. त्याने आपल्या अभिनयाने देशातच नाही, तर थेट जगात आपला चाहतावर्ग निर्माण केला आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते एखादा चातक जसा पावसाची वाट पाहत बसतो, अगदी तसेच अभिनेत्याची वाट पाहतात. सध्या कोरोना व्हायरसमुळे त्याच्या ‘मन्नत’ घराबाहेर चाहत्यांची गर्दी पाहायला मिळत नाही. कोरोनापूर्वी त्याच्या घराबाहेर उभा राहायलाही जागा नसायची. एवढे चाहते त्याचे दीवाने आहेत. परंतु केवळ सामान्य लोकच नाहीत, तर चक्क बॉलिवूडमधील कलाकारही शाहरुखचे चाहते आहेत. त्याच्यासोबत काम करण्यासाठी इच्छुक असतात. अशीच एक अभिनेत्री म्हणजे फातिमा सना शेख होय. तीदेखील शाहरुखची मोठी चाहती आहे. याचा खुलासा तिने स्वत: केला आहे.

खरं तर फातिमा सना शेखने शाहरुखसोबत ‘वन २ का ४’ चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले होते. परंतु जेव्हा ती मोठी झाली, तेव्हा फातिमा एका दिवाळीच्या पार्टीमध्ये शाहरुखला भेटली होती. फातिमा ही आपली सहकलाकार सान्या मल्होत्रासोबत या दिवाळी पार्टीमध्ये पोहोचली होती. जिथे शाहरुखही उपस्थित होता.

अभिनेत्रीने सांगितल्यानुसार, यादरम्यानच कोणीतरी केलेल्या एका विनोदावर ती जोरजोरात हसू लागली आणि चुकून तिने शाहरुख खानच्या हाताला स्पर्श केला. यानंतर तिने दिवसभर आपला हात धुतला नव्हता.

बॉलिवूड हंगामाशी बोलताना फातिमाने या संपूर्ण घटनेचा खुलासा केला होता. ती म्हणाली होती की, “जर शाहरुखलाही याबाबत समजले, तर ते कधीही माझ्यासोबत काम करणार नाहीत.” फातिमाच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती नुकतीच नेटफ्लिक्सच्या ‘अजीब दास्तांस’मध्ये झळकली आहे. यामध्ये तिच्यासोबत दिग्गज अभिनेते जयदीप अहलावतही आहेत.

यापूर्वी फातिमा ‘ल्यूडो’मध्ये मुख्य भूमिकेत झळकली होती. नुकतेच तिने सोशल मीडियावरून ब्रेक घेतल्यामुळे ती चर्चेत होती. तिने सोशल मीडियावरच याची घोषणा केली होती की, ती काही दिवस सोशल मीडियावरून ब्रेक घेत आहे.

फातिमाने बालकलाकार म्हणून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. तिने ‘चाची ४२०’ मध्ये कमल हासन आणि तब्बू यांच्या मुलीची भूमिका साकारली होती. ती ‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट’ आमिर खानसोबत ‘दंगल’ चित्रपटातही झळकली. त्यानंतर तिच्या प्रसिद्धीत कमालीची वाढ झाली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-फक्त शर्ट घालून अभिनेत्री दीपिका सिंगने केले सिझलिंग फोटोशूट, पाहून तुमचंही हरपेल भान

-बॉलिवूडमधील ‘काटा लगा गर्ल’ शेफाली जरीवालाने केले बिकिनीमधील फोटो शेअर, चाहत्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव

-अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानीच्या जबरदस्त व्हिडिओवरून हटेना चाहत्यांची नजर; पाहा तिची मोहक अदा

हे देखील वाचा