Monday, December 22, 2025
Home बॉलीवूड ‘बोल्ड आणि हॉट सिन केले नाही, तर…’, करीनाला ‘त्या’ भूमिकेसाठी आई- बाबांनी दाखवली दिशा

‘बोल्ड आणि हॉट सिन केले नाही, तर…’, करीनाला ‘त्या’ भूमिकेसाठी आई- बाबांनी दाखवली दिशा

बॉलिवूडची ‘बेबो’ करीना कपूर खान तिच्या हटके आणि दमदार भूमिकेसाठी ओळखली जाते. अभिनयामध्ये तिने खूप लवकरच यशाचे शिखर गाठले. तसेच ९० च्या दशकातील अनेक अभिनेत्री सध्या पडद्यावर झळकत नाहीत. परंतु बेबोने तिची रुपेरी पडद्यावरील पकड अद्याप मजबूत ठेवली आहे. तिने आजवर हॉट, बोल्ड, भावनिक, प्रेमळ अशा अनेक भूमिका उत्तमरीत्या पार पाडल्या आहेत. आपल्याला कोणत्या चित्रपटाची स्क्रिप्ट निवडायला हवी याचे तिला उत्तम ज्ञान आहे. परंतु एके काळी तिच्या आयुष्यात असा चित्रपट आला होता, जो करण्यासाठी तिला आई- वडिलांचा देखील सल्ला घ्यावा लागला होता.

साल २००३ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट ‘चमेली’मध्ये तिने उत्तम अभिनय केला. परंतु या चित्रपटामध्ये वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेची भूमिका साकारायची होती. जेव्हा तिच्या हातामध्ये या चित्रपटाची स्क्रिप्ट आली, तेव्हा तिने यावर खूप विचार केला. प्रेक्षक आपल्याला स्वीकारतील की नाही? बॉलिवूडमधील कारकिर्दीला लोकं नावं तर नाही ना ठेवणार? असे अनेक प्रश्न तिच्या मनामध्ये त्यावेळी येत होते. (When actress Kareena Kapoor Khan was offered film Chameli she was confused about her bold role)

आई- वडिलांचा घेतला सल्ला
स्वतः विचार करून करीना निर्णय घेऊ शकत नव्हती, त्यामुळे तिने तिच्या आई- वडिलांचा या चित्रपटासाठी सल्ला घेतला. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये ती म्हणाली होती की, “मी आई- बाबांना या चित्रपटाविषयी सांगितले, तेव्हा ते मला म्हणाले की, हा चित्रपट चांगला आहे. तू आताच असे बोल्ड आणि हॉट सिन केले नाही, तर तू फक्त त्याच त्याच भूमिका साकारताना प्रेक्षकांना दिसशील. हा चित्रपट तुझी कारकीर्द पुढे नेण्यास मदत करेल. असे आव्हानात्मक अभिनय केल्यास खूप काही शिकायला मिळते.”

त्यांनतर तिने या चित्रपटासाठी होकार दिला. चित्रपटसृष्टीमध्ये येऊन तिला फक्त ४ वर्ष झाले होते. त्यावेळी तिला या चित्रपटाची ऑफर आली होती. त्यामुळे बेबो थोडी डळमळली. परंतु नंतर तिने या चित्रपटामध्ये दमदार अभिनय करून प्रेक्षकांची आणि समीक्षकांची खूप पसंती मिळवली. या चित्रपटाची रूपरेषा अनंत बलानी यांनी आखली होती. परंतु शूटिंग दरम्यानच त्यांचे निधन झाल्याने सुधीर मिश्रा यांनी हा चित्रपट पूर्ण केला. या चित्रपटामध्ये करीनासह राहुल बोस, यशपाल शर्मा, रिंकी खन्ना आणि मकरंद देशपांडे या कलाकारांनी देखील दमदार अभिनय साकारला.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-लग्नाच्या पसरलेल्या बातम्यांवर आदित्य सीलने लावला पूर्णविराम; म्हणाला, ‘यात लपवण्यासारखं आहे तरी काय?’

-कोणी म्हणतंय ‘रावणाचा ड्रेस’, तर कोणी ‘पक्षीराज’; विचित्र आउटफिटमुळे ट्रोल झाली उर्वशी

-राज कुंद्राच्या सुटकेनंतर गहना वशिष्ठने शेअर केली पोस्ट; म्हणाली, ‘तू खूप…’

हे देखील वाचा