Tuesday, January 20, 2026
Home बॉलीवूड सोनू सूदला पाहून जेव्हा ऐश्वर्याला आली होती तिच्या ‘पा’ची आठवण; आजही म्हणते त्याला ‘भाईसाहब’

सोनू सूदला पाहून जेव्हा ऐश्वर्याला आली होती तिच्या ‘पा’ची आठवण; आजही म्हणते त्याला ‘भाईसाहब’

बॉलिवूडमधील बच्चन कुटुंब एक नावाजलेले कुटुंब आहे. असे खूप कमी लोक असतात ज्यांना बच्चन कुटुंबासोबत काम करण्याची संधी मिळते. अशातच अभिनेता सोनू सूदने २०१३ साली दिलेल्या एका मुलाखतीत अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला होता. त्याने सांगितले होते की, अमिताभ बच्चन हे त्यांच्या कामाप्रती खूप सिरियस असतात.

सोनू सूदने दिलेल्या एका मुलाखतीत बच्चन कुटुंबासोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे. जेव्हा सोनू सूदला विचारले होते की, तुमचा आवडता को-स्टार कोण आहे. यावर त्याने सांगितले होते की, “मला मिस्टर बच्चनसोबत काम करताना सर्वात जास्त मजा आली होती.”

त्याने पुढे सांगितले की, “‘बुड्ढा होगा तेरा बाप’ या चित्रपटात पहिल्याच सीनमध्ये मला मिस्टर बच्चन यांना धक्का मारायचा होता. हा सीन माझ्यासाठी खूप कठीण होता. त्यावेळी मी दिग्दर्शकाला म्हणलो की, ज्यांची इज्जत करून मी मोठा झालो आहे, आज त्यांच्याशीच असं कसं वागू शकतो.” सोनू सूदने सांगितले की, “अमिताभ बच्चन हे चित्रपटासाठीच बनलेले आहेत. ते नेहमीच सेटवर हजर असायचे आणि त्यांच्या डायलॉगचा सराव करत असायचे. मी पण असचं करायचो आणि मला असं सराव करताना पाहून त्यांना खूप आनंद होत असायचा.”

त्याने पुढे सांगितले की, “अभिषेक बच्चन अजिबात दिखावा करत नाही. आम्ही ‘युवा’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटात तो माझा भाऊ होता. ऐश्वर्या सुरुवातीला खूप रिजर्व असायची. परंतु ‘जोधा अकबर’ चित्रपटातील एका सीन दरम्यान तिचे माझ्यासोबत खूप चांगले जमायला लागले. त्यावेळी ती मला म्हणाली होती की, तुमच्याकडे बघून मला माझ्या पाची आठवण येते. या चित्रपटात मी तिचा भाऊ होतो. तेव्हापासून ती मला भाई साहब असंच म्हणते.”

अमिताभ बच्चन आणि सोनू सूद यांच्या लूकमध्ये बऱ्याच प्रमाणात सारखेपणा आहे. नुकतेच अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ‘रेशमा और शेरा’ या चित्रपटातील एक थ्रोबॅक फोटो शेअर केला होता. तेव्हा त्याच्याकडे पाहून लोकांना सोनू सूदची आठवण आली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-वयाच्या चौथ्या वर्षी गायनाला सुरूवात करणाऱ्या सोनूने अभिनयातही आजमावलाय हात; वाचा त्याचा सुरेल प्रवास

-‘मनमोहिनी आज पाहिली…’, म्हणत कोणाच्यातरी विचारात गुंग झालाय स्वप्नील जोशी

-‘अश्रू आणि घाम दोन्हींमध्ये मीठ असतं, पण…’ अमिताभ बच्चन यांची लक्षवेधी पोस्ट इंटरनेटवर व्हायरल

हे देखील वाचा