काही दिवसांपूर्वीच भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेने या जगाचा निरोप घेतला. आज जरी ती आपल्यामध्ये नसली तरी तिची गाणी, आणि सिनेमे प्रेक्षकांचे सतत मनोरंजन करत आहे आणि राहतील. आकांक्षाचा मृत्यू कशामुळे झाला याचे अजून कोणतेच धागेदोरे सापडत नाही. मात्र तिच्या आईने तिच्या मृत्यूसाठी तिचा बॉयफ्रेंड असणाऱ्या समर सिंगला जबाबदार धरले आहे. यूटुबवर समर सिंगसोबत तिचे अनेक म्युझिक व्हिडिओ आपल्याला सापडतील.
याशिवाय भोजपुरीमधील इतरही अनेक कलाकारांसोबतचे तिचे म्युझिक व्हिडिओ तुफान हिट झाले. आकांक्षाचे ‘ये आरा कभी नहीं हारा’ हे शेवटचे गाणे ठरले. या गाण्याला तुफान प्रतिसाद मिळत आहे. तिने पवनसिंग, खेसरीलाल अशा टॉपचा अभिनेत्यांसोबत काम केले होते. सध्या तिचा खेसरीलाल सोबतच एक म्युझिक व्हिडिओ चांगलाच गाजत आहे.
भोजपुरीमधील सुपरस्टार अभिनेता असलेल्या खेसारी लालसोबत आकांशा ‘नाच के मलकिनी’ या म्युझिक व्हिडिओमध्ये झळकली होती. हे गाणे एकदम बॉलिवूड स्टाईलने शूट केले गेले होते. या गाण्यात आकांक्षा आणि खेसारी यांनी खूपच रोमॅंटिक सीन देत त्यांच्या केमिस्ट्रीने लोकांचे लक्ष वेधून घेतले होते. गाण्यात आकांक्षा एक आयटम गर्ल बनली ओटी. दरम्यन हे गाणे तिच्या करियरच्या अगदी सुरुवातीच्या दिवसातले होते. या गाण्याला आतापर्यंत ७ कोटींपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
सारेगम हम भोजपुरी या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झालेल्या ‘नाच के मलकिनी’ या गाण्याला मोठ्या आणि भव्य स्तरावर चित्रित करण्यात आले होते. या गाण्याला प्रेक्षकांनी खूप डोक्यावर घेतले होते. या गाण्याला विशाल भारतीने लिहिले दिले असून, आर्या शर्माने संगीत दिले आहे. गुंजन सिंह कश्यप दिग्दर्शित केलेल्या या गाण्याची कोरिओग्राफी लकी विश्वकर्माने केली आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दुःखद! प्रसिद्ध रंगभूमिकार आणि अक्षरा थिएटरच्या सहसंस्थापक असलेल्या ‘या’ जेष्ठ अभिनेत्रींचे निधन