अक्षय कुमार (Akshay Kumar) हा बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. आपल्या अभिनयाइतकाच तो त्याच्या बिंधास्त वक्तव्यासाठी माध्यमांमध्ये नेहमीच चर्चेत असतो. अनेक सामाजिक कार्यांमध्येही अक्षय कुमार आपला सहभाग नोंदवत असतो त्यामुळेच एक सामाजिक भान जपणारा अभिनेता अशी त्याची सिनेसृष्टीत खास ओळख आहे. अक्षय कुमारला अनेकदा त्याच्या व्यक्तीमत्वाबद्दल विचारले जाते. त्याचबरोबर कोणता आदर्श तुला समाजासमोर ठेवायचा आहे असेही प्रश्न अनेकदा विचारण्यात आले. त्यावर पहिल्यांदाच अक्षय कुमारने खुलासा केला आहे.
अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या रक्षाबंधन चित्रपटामुळे सर्वत्र चर्चेत आहे. 2017 मध्ये, अक्षय कुमार राजीव मसंद यांच्या एक्टरर्स राऊंडटेबलमध्ये सहभागी झाला होता. या मुलाखतीत त्याच्यासोबत इरफान खान, आयुष्मान खुराना, राजकुमार राव आणि वरुण धवन होते. आदर्श ठेवण्याच्या विषयावर अक्षय कुमार म्हणाला होता, ‘माझ्यासाठी फक्त एकच गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे काम करत राहणे. कारण तेच मला जिवंत ठेवेल. मला काम करायला आवडते. मला सुट्टी साजरी करायला आवडते. मी माझ्या कुटुंबावर प्रेम करतो. आणि मला तेच हवे आहे. हा वारसा चालत राहतो, काहीच येत नाही.
तो पुढे म्हणाला, ‘मी अनेक मोठे कलाकार, जुने कलाकार पाहिले आहेत. एक सुपर डुपर स्टार प्रॉडक्शनच्या एका माणसाशी १०० रुपयांसाठी भांडत होता. तो छोट्या छोट्या भूमिका करत होता. त्यात काहीच नाही. आयुष्यात असे काही व्हावे, मोठ्या लोकांचा आदर व्हावा असे मला वाटते. आदर्श निर्माण करुन काही मिळत नाही असेही तो पुढे म्हणाला. अक्षय कुमारच्या या वक्तव्यावर अनेकांनी त्याच्या या वक्तव्याचे कौतुक केले होते.
दरम्यान अक्षय कुमारचा रक्षाबंधन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘रक्षा बंधन’ व्यतिरिक्त अक्षय कुमारकडे ‘राम सेतू’, ‘OMG 2 – ओह माय गॉड’ आणि सूरराई पोत्रूचे हिंदी रिमेक आहेत. ‘रक्षा बंधन’ बद्दल बोलायचे तर हा चित्रपट एका भाऊ आणि त्याच्या चार बहिणींचा आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. त्याची टक्कर आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’शी होणार आहे. म्हणजेच दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत.
हेही वाचा – फ्रेंडशिप डे स्पेशल: कार्तिक आर्यनने पहिल्यांदाच केला त्याच्या जिवलग मित्राबद्दल खुलासा, पाहा व्हिडिओ
रणवीरच्या न्यूड फोटोशूटवर ट्विंकल खन्नाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली, ‘मी झूम करुन करुन बघितलं पण…’
‘तुमच्या जाण्याने कार्यक्रम बंद होणार नाही…’ शैलेश लोढा यांच्यावर पहिल्यांदाच साधला निशाणा