Saturday, April 5, 2025
Home बॉलीवूड कलंकच्या सेटवर वरून धवनशी भांडली होती आलीया भट्ट; कारण जाणून आश्चर्य होईल…

कलंकच्या सेटवर वरून धवनशी भांडली होती आलीया भट्ट; कारण जाणून आश्चर्य होईल…

आलिया भट्ट आणि वरुण धवनने ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून एकत्र डेब्यू केले होते. तेव्हापासून दोघांमध्ये घट्ट मैत्री आहे. पण एकदा या मैत्रीत दुरावा निर्माण झाला. एकदा ‘कलंक’ चित्रपटाच्या सेटवर दोघांमध्ये जोरदार भांडण झाले होते. 

‘स्टुडंट ऑफ द इयर’नंतर आलिया आणि वरुणने ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ आणि ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’मध्ये एकत्र काम केले होते. या दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडते.त्यामुळेच हे दोघे पुन्हा एकदा ‘कलंक’मध्ये एकत्र दिसले. हा चित्रपट 2019 मध्ये आला होता. ज्यामध्ये त्याच्यासोबत सोनाक्षी सिन्हा आणि आदित्य रॉय कपूर दिसले होते.

पण या चित्रपटाच्या सेटवर आलिया आणि वरुण यांच्यात असं काही घडलं की त्यांच्यातील संवाद थांबला. कपिल शर्माच्या शोमध्ये पोहोचल्यावर खुद्द आलिया-वरूणनेच याचा खुलासा केला होता.यादरम्यान वरुणने सांगितले की, जेव्हा आम्ही शूटिंग करत होतो, तेव्हा आलिया सेटवर येऊन माझ्याशी बोलतही नव्हती. त्यामुळे आमच्यात त्यावेळी खूप भांडण झाले. कारण तिने मला वृत्ती दाखवली.

वरुणने सांगितले की, मग मी तीला विचारले होते की तुला काय झाले आहे? दोन-तीन मोठे सिनेमे साईन केल्यावर तुम्हाला त्याचा वारा लागला का? वरुण म्हणाला, ‘यानंतर आलिया एका सीनमध्ये पडणार होती, तेव्हा मी तिला पकडले. यानंतर ती खूश झाली आणि आमची चर्चा पुन्हा सुरू झाली आणि आमची पुन्हा मैत्री झाली…’

आलिया भट्ट लवकरच ‘जिगरा’ चित्रपटात दिसणार आहे. ज्यामध्ये वेदांग रैनाही दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

बॉलीवूडचे हे स्टार्स वापरत नाहीत सोशल मिडिया; नवनवीन ट्रेंड्स पासून चार हात लांब…

हे देखील वाचा