Thursday, April 17, 2025
Home बॉलीवूड इब्राहिमचा मेसेज वाचून आलिया म्हणाली होती हा मुलगा खूप क्यूट आहे…

इब्राहिमचा मेसेज वाचून आलिया म्हणाली होती हा मुलगा खूप क्यूट आहे…

सध्या आलिया तिच्या आगामी ‘जिगरा’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात आलिया वेदांग रैनासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. दरम्यान, आलिया भट्टची एक जुनी मुलाखत समोर आली आहे, ज्यामध्ये तिने अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानचे कौतुक केले आहे आणि त्याला सर्वात क्यूट व्यक्ती म्हटले आहे.

खरं तर, जेव्हा आलिया भट्ट आणि रणवीर सिंग २०२२ मध्ये त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कॉफी विथ करण या शोमध्ये गेले होते, तेव्हा आलियाने सैफचा मुलगा इब्राहिमबद्दल सांगितले होते की तो सर्वात गोंडस व्यक्ती आहे. इब्राहिम अली खानबद्दल आलिया पुढे म्हणाली की, ती आजवर भेटलेल्या सर्व लोकांपैकी तो सर्वात गोड व्यक्ती  आहे.

एवढेच नाही तर आलियाने करणच्या शोदरम्यान इब्राहिमचा मेसेजही वाचून दाखवला. मेसेज वाचताना आलिया म्हणाली, “तुम्हाला वैयक्तिकरित्या मेसेज पाठवण्यासाठी वेळ काढावा लागला” (ज्याला रणवीर आणि केजो हसू आवरले नाहीत) आलियाबद्दल बोलताना रणवीर म्हणाला, “कारण तुमचे जीवन जेफ बेझोसपेक्षा व्यस्त आहे. 

आलियाने पुढे इब्राहिमचा मेसेज वाचला, “तू गंगू म्हणून खूप चांगली वाटलीस आणि तुला राणीच्या रूपात पाहताना छान वाटले. तू स्वतःला सहज जुळवून घेतोस असे म्हणणे योग्य ठरेल. तू खूप चांगली आहेस, देशाची तू सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे.” इब्राहिमचा असा गोंडस आणि मजेदार संदेश ऐकून रणवीर सिंग आणि करण जोहर जोरजोरात हसायला लागले.

कामाबद्दल बोलायचे झाले तर, आलिया भट्ट तिचा जिगरा चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी सज्ज आहे, जो ११ ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. रणवीर सिंग नुकताच एका बाळाचा बाप झाला आहे. तो लवकरच सिंघम अगेन, डॉन 3 याशिवाय अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे. इब्राहिम अली खान लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. इब्राहिमने काजोल आणि पृथ्वीराज सुकुमारनसोबत सरजमीन चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा –

वीर दास पूर्वी या विनोदवीरांनी होस्ट केलाय एमी पुरस्कार सोहळा; जाणून घ्या ही अनोखी यादी…

हे देखील वाचा