बॉलिवूडमधील तुमची सर्वात आवडती अभिनेत्री कोण? असा जर प्रश्न विचारला, तर कदाचित प्रत्येकवेळी तुमचे उत्तर हेे वेगळे असू शकते. परंतु बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे या प्रश्नाचे उत्तर कधीच बदलले नाही. बिग बींचा चाहतावर्ग कोटींच्या घरात आहे. लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तीपर्यंत प्रत्येकजण त्यांचा चाहता आहे. परंतु जेव्हाही बिंग बींना विचारले की, त्यांची आवडता अभिनेता किंवा अभिनेत्री कोण आहे? तेव्हा त्यांनी दिलीप कुमार आणि वहीदा रहमान यांचेच नाव घेतले आहेे. वहीदा आणि बिग बींचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. त्यातीलच एक आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया…
नेहमीपासूनच बिग बींना वहीदा रहमान आवडतात. एकेवेळ अशी होती, जेव्हा बिग बींना त्यांच्यासोबत काम करायचे होते. ज्यावेळी ती संधी मिळाली, तेव्हा बिग बी खूपच खुश झाले होते. इतकेच नाही, तर त्यांनी या चित्रपटाच्या सेटवर वहीदा यांच्याकडून चापटही खाल्ली होती आणि त्यांची चप्पलही घेऊन पळाले होते.
बिग बींना वहीदा यांच्यासोबत सन १९७१ मधील ‘रेशमा और शेरा’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती. या चित्रपटात या दोघांव्यतिरिक्त सुपरस्टार सुनील दत्तही मुख्य भूमिकेत होते. चित्रपटात बिग बी मुक्या मुलाची भूमिका साकारणार होते. या चित्रपटातील एक सीन होता, जेव्हा वहीदा बिग बींना चापट मारणार होत्या. सेट आणि शॉट सर्वकाही तयार होते. सेटवर वहीदा बिग बींना म्हणतात की, तुम्हाला खूप जोरात चापट लागणार आहे.
या सीनला सुरुवात होते आणि वहीदा बिग बींना जोरदार कानशिलात लगावतात, तेव्हा स्वत: बिग बीसुद्धा चकित होतात. त्यावेळी सेटवरील सर्वजण शांत असतात, थोड्या वेळानंतर बिग बी वहीदा यांचा हात गालावर ठेवत म्हणतात, “चांगली होती.” यानंतर त्यांनी सांगितले की, याचे त्यांना जरासुद्धा वाईट वाटले नाही.
यानंतर याच चित्रपटातील एक सीन होता, जेव्हा सुनील दत्त आणि वहीदा एकमेकांसोबत रोमँटिक सीन शूट करणार होते. यादरम्यान दोघांनाही पायात काहीच न घालता तापलेल्या मातीवर शूटिंग करायची होती. लोकेशनवरील वातावरण खूपच तापलेले होते. त्यामुळे तिथे बूट घालूनदेखील पायाला त्रास होत होता. अशामध्ये त्या मातीवर पायात काहीच न घालता चालणे हे खूपच त्रासदायक ठरले असते.
बिग बी या गोष्टीमुळे खूपच चिंतेत होते की, इतक्या त्रासदायक ठिकाणीही वहीदा चप्पल न घालता शूटिंग कशा करणार? शूटिंग दरम्यान दिग्दर्शकाच्या ब्रेक घेण्याच्या वक्तव्यावर बिग बींनी वहीदा यांची चप्पल उचलली आणि त्यांच्या दिशेने धावू लागले. बिग बी म्हणाले होते की, तो क्षण किती विशेष होता, हे शब्दात सांगणे खूप कठीण आहे.
सन, १९७८ मध्येे आलेला चित्रपट ‘त्रिशूल’मध्ये वहीदा यांनी बिग बींच्या आईची भूमिका साकारली होती. त्यानंतर सन २००२ मध्ये आलेला ‘ओम जय जगदीश’ या चित्रपटात अभिषेक बच्चन यांच्या आईची भूमिका निभावली होती. बिग बी आणि वहीदा रहमान हे दिग्दर्शक ओमप्रकाश मेहरा यांच्या ‘दिल्ली ६’ चित्रपटात काम केले होते. यामध्ये त्या दोन्ही कलाकारांनी अभिषेक बच्चनच्या आजी आणि आजोबाची भूमिका साकारली होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-










