Monday, July 1, 2024

अमिताभ बच्चन यांनी जेव्हा पहिल्यांदा केला होता आमिर खानला फोन; उत्तर देताना म्हणायचा फक्त ‘हे’ दोन शब्द

बॉलिवूडचा ‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट’ म्हणून आमिर खानला ओळखले जाते. आपल्या प्रत्येक कामात कदाचित तो परफेक्ट असल्यामुळेच त्याला हे टायटल मिळाले असावे. त्याने तब्बल ३० वर्षांपेक्षा अधिक काळ चित्रपटसृष्टीची सेवा केली आहे. या इतक्या वर्षांमध्ये त्याने अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे दिले आहेत. त्याचा चाहतावर्ग हा फक्त बॉलिवूडच नाही, तर संपूर्ण जगभरात आहे. त्याच्या चाहत्यांची संख्या जरी कोट्यवधीमध्ये असली, तरीही तो मात्र महानायक अमिताभ बच्चन यांचा जबराट चाहता आहे. मुलाखतीमध्ये आमिर खानने अमिताभ बच्चन यांच्यासोबतची पहिली बातचीत शेअर केली होती.

आमिरने (aamir khan)म्हटले होते की, “मी त्या दिवसांमध्ये आपला ‘जो जीता वही सिकंदर’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होतो. हॉटेलच्या रिसेप्शनिस्टने मला सांगितले की, ‘अमिताभ बच्चन यांना माझ्याशी बोलायचंय. त्यांचा फोन आला आहे.’ मला वाटले असेच कोणीतरी चेष्टा करत आहे. पुन्हा हॉटेलच्या रिसेप्शनवर फोन आला, तेव्हा मी आवाज ऐकून अमिताभ बच्चन यांना ओळखले आणि त्यांच्याशी बोललो.”

“त्यावेळी अमिताभ सरांनी मला लंडनमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या एका कॉन्सर्टबद्दल सांगण्यासाठी फोन केला होता. ते जे काही बोलायचे त्याला उत्तर देताना मी फक्त ‘यस सर’ म्हणायचो,” असे आमिर खान पुढे बोलताना म्हणाला.

यानंतर त्याने म्हटले की, “जर अमिताभ सरांनी त्यावेळी मला विचारले असते की, ऊटीचे वातावरण कसे आहे? तेव्हा यावरही मी फक्त ‘यस सर’ असेच म्हणालो असतो.” शेवटी त्याने असेही सांगितले की, फोनवर जेव्हाही अमित अंकल असे लिहिलेला फोन यायचा, तेव्हा तो उभा राहायचा आणि उभे राहूनच बोलायचा.

आमिर खानने सन १९८८ मध्ये ‘कयामत से कयामत तक’ या सिनेमातून पदार्पण केले होते. या चित्रपटात त्याच्यासोबत जुही चावला मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही नक्की वाचा-

हे देखील वाचा