Tuesday, July 9, 2024

जेव्हा गोरा रंगच येत होता करिअरमध्ये आडवा, सौम्या टंडनने सांगितला तिच्या आयुष्यातील ‘तो’ किस्सा

‘भाभी जी घर पर है’ ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यातली एक म्हणजे सौम्या टंडन. सौम्याने ‘जब वी मेट’ या चित्रपटात देखील काम केलं आहे.

हीच सौम्या (saumya tondon) तिच्या सौंदर्य आणि ग्लॅमरस लूकमुळे कायम चर्चचा विषय ठरत असते. तिने या शोमधून आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केली आहे. सौम्याची आज इंडस्ट्रीमध्ये एक वेगळीच ओळख आहे. सौम्या टंडन प्रेक्षकांमध्ये ‘गोरी मेम’ या नावाने प्रसिद्ध आहे. परंतु तुम्हाला माहित आहे का सौम्याला तिच्या गोरेपणामुळे नाकारण्यात आलं होतं.

एका मुलाखती दरम्यान सौम्याने याचा खुलासा केला होता. माध्यमातील माहितीनुसार तिच्या आयुष्याशी संबंधित तिने एक किस्सा शेअर करताना सांगितलं की, तिला निष्पक्षतेबद्दल काम मिळाले नाही. यानंतर तिने संपूर्ण माहिती सांगितली की, ‘ती एक आंतराष्ट्रीय प्रोजेक्ट्साठी एका भारतीय नागरिकांच्या भूमिकेसाठी ऑडिशनला गेली होती.’ ती पुढे म्हणाली की, ‘ऑडिशन घेत असताना दिसलं की ती खूप गोरी आहे आणि ती भारतीय आहे, याच वेळी तिला नकार देण्यात आला.’ तिने पुढे तिने असं सुद्धा सांगितलं की, तिथे तिला ते असे म्हणाले की, “आम्ही भारतीय मुलींना गोरी दाखवू शकत नाही.’

पुढे सौम्य म्हणाली की, “त्या लोकांना विश्वास बसत नव्हता की, मी भारतीय आहे आणि इथे खूप गोऱ्या मुली आहेत. कारण अमेरिका, लंडन, पाश्चिमात्य देशात इतक्या गोऱ्या मुली असा त्यांचा दृष्टिकोन होता.” पुढे ती म्हणाली की, “भारतीय मुली सावळ्या असतात असा त्यांचा समज होता. लोकांचा असा विश्वास आहे की फक्त गोरी त्वचा असलेल्या मुळीच सुंदर असतात, पण असं अजिबात नसतं. प्रत्येक रंग सुंदर असतो.” यानंतर अनेकांना दृष्टिकोन बदलला.

हेही वाचा :

‘बिग बॉस १५’ ला मिळाली विजेती स्पर्धक, ट्रॉफीवर कोरले तेजस्वी प्रकाशचे नाव

शाहिद आणि मीराची जोडी पुन्हा एकदा आली चर्चेत, सोशल मीडियावर व्हायरल होतोय नवा फोटो

‘हे’ आहेत आलिया भट्टच्या करिअरला कलाटणी देणारे सुपरहिट चित्रपट, वाचा संपूर्ण यादी

 

हे देखील वाचा