ऐंशी आणि नव्वदचे दशक गाजवलेली अभिनेत्री नीना गुप्ता ‘बधाई हो’ या चित्रपटातून पुन्हा एकदा प्रकाशझोतात आल्या. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात खूपच चढ-उतार आले. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक समस्यांचा सामना केला. परंतु कधीच पराभव स्वीकारला नाही. इतर अभिनेत्रींप्रमाणे नीना देखील सोशल मीडियावर सक्रिय असतात. नुकताच त्यांनी शेअर केलेला एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. यामध्ये त्यांनी आजच्या पिढीतील तरुणींना एक मोलाचा सल्ला दिला होता.
नीना गुप्ता बॉलिवूडमधील एक मोठं नाव आहे. त्यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक यशस्वी चित्रपट दिले आहेत. यासोबतच त्यांनी माध्यमांचेही लक्ष वेधले आहे. परंतु एक काळ असा होता, जेव्हा त्या आपल्या व्यावसायिक कामांव्यतिरिक्त वेस्ट इंडिजचे महान क्रिकेटपटू सर व्हिव्हियन रिचर्ड्स यांच्यासोबतच्या आपल्या संबंधांमुळे चर्चेत होत्या.
नीना यांनी कधीच आपल्या या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांनी सर्व गोष्टी उघडपणे मांडल्या होत्या. इतकेच नाही, तर त्यांनी सोशल मीडियावरही आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनुभव शेअर केले. आता त्यांचा एक व्हिडिओ शेअर होत आहे. यामध्ये त्यांनी रिचर्ड्स यांच्यासोबतच्या आपल्या नात्याबद्दल अनेक अनुभवांचा खुलासा केला होता.
या व्हिडिओत नीना यांनी तरुणींना संदेश दिला आहे. त्यांनी आपल्या अनुभवानुसार त्यांना सांगितले आहे की, “आयुष्यात कधीही लग्न झालेल्या व्यक्तीच्या प्रेमात पडू नका, नाही तर तुम्हाला भरपूर समस्यांचा सामना करावा लागेल.” यासाठी त्यांनी स्वत:चे उदाहरणही दिले होते.
या व्हिडिओमध्ये त्यांनी चांगल्याप्रकारे समजावून सांगितले होते की, विवाहित पुरुषासोबत प्रेम का नाही केले पाहिजे. त्यांनी म्हटले होते की, “खरं सांगायचं झालं, तर काही असे डायलॉग्ज आहेत, जे मी तुम्हाला सांगेल. सुरुवातीला तुम्ही त्या व्यक्तीच्या प्रेमात पडता. तुम्हाला तो आवडू लागतो, त्यामुळे तुम्ही त्याच्याबरोबर वेळ घालवू लागता. त्यानंतर तुम्ही वीकेंड्सच्या योजनाही बनवू लागता. त्या व्यक्तीलाही घरी खोटे सांगून तुमच्यासोबत यावे लागते.”
पुढे बोलताना त्या म्हणतात, “अशाप्रकारे तुमच्या इच्छा आणि अपेक्षा वाढू लागतात. जेव्हा तुम्ही लग्नाबद्दल बोलता, तेव्हा हे प्रकरण इथेच वेगळी वाट धरू लागते. कारण तो व्यक्ती आधीपासूनच विवाहित असतो. त्याच्यासाठी पत्नीसोबत घटस्फोट घेणे आणि संपत्ती तसेच बँक अकाउंट्स यांसारख्या गोष्टी पाहता प्रकरण खूपच गुंतागुंतीचे बनून जाते. शेवटी लग्न करण्याची योजना इथेच संपुष्टात येते आणि त्यानंतर शेवट दु:खद होतो.” त्यामुळे त्या म्हणतात की, माझ्या अनुभवानुसार सर्व तरुणींना माझा सल्ला आहे की, त्यांनी विवाहित व्यक्तीच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकले नाही पाहिजे.
नीना गुप्ता या आधीपासूनच विवाहित असलेल्या रिचर्ड्स यांच्या प्रेमात पडल्या होत्या. त्यानंतर सन १९८९ मध्ये मुलगी मसाबा हिचा जन्म झाला. नीना यांनी आधीही सांगितले होते की, अविवाहित जोडप्याची मुलगी असून मसाबाने खूप काही त्रास सहन केला आहे. नीना यांनाही खूप समस्यांचा सामना करावा लागला. एक वेळ अशी आली की, त्यांच्याकडे पैसे राहिले नाही, मित्रमंडळी तसेच नातेवाईकही राहिले नाहीत. सर्वांना त्यांच्यापासून दुरावा केला होता. यानंतर खूप हिमतीने नीना यांनी आपल्या जोरावर सर्वकाही सांभाळले होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-बापरे! प्रीति झिंटाला किस करणे रितेशला पडले भलतेच महागात, जेनेलियाने केली चांगलीच धुलाई
-अक्षरा सिंगच्या ‘पगली बुलावे’ गाण्याची यूट्यूबवर जोरदार एंट्री! पुन्हा लावले चाहत्यांना वेड