Wednesday, December 3, 2025
Home बॉलीवूड पडद्यावर शाहरुखला मारणे जेव्हा गुलशन ग्रोव्हरला खऱ्या आयुष्यात पडले महागात!

पडद्यावर शाहरुखला मारणे जेव्हा गुलशन ग्रोव्हरला खऱ्या आयुष्यात पडले महागात!

अभिनेते गुलशन ग्रोव्हर (Gulshan Grover) हे बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहेत, ज्यांनी आपल्या बहुतेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे. त्यांनी नकारात्मक व्यक्तिरेखेद्वारे आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावले आहे. त्यामुळेच त्यांना बॉलिवूडचा ‘बॅडमॅन’ म्हटले जाते. त्यांनी आपल्या करिअरमध्ये बॉलिवूडच्या अनेक बड्या सुपरस्टार्ससोबत काम केले आहे, त्यापैकी एक नाव म्हणजे शाहरुख खान (Shahrukh Khan).

गुलशन ग्रोव्हर शाहरुखच्या अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसले असून, पडद्यावर दोघांमध्ये भांडणही झाले आहे. मात्र, पडद्यावर शाहरुखला मारहाण करणे वास्तविक जीवनात गुलशन ग्रोवरला महागात पडले, ज्याचा उल्लेख खुद्द गुलशन ग्रोव्हर यांनी केला होता. (when gulshan grover not get visa of morocco because of shahrukh khan)

‘द कपिल शर्मा शो’मध्ये सांगितला किस्सा
खरं तर, एकदा गुलशन ग्रोव्हर आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये आले होते. जिथे त्यांनी एक किस्सा सांगितला. त्यांनी सांगितले होते की, एकदा ते चित्रपटाच्या शूटिंगसाठी दुसऱ्या देशात जात होते. जिथे थेट विमान नव्हते. त्यामुळे त्यांना आधी मोरोक्कोला जावे लागले आणि नंतर तेथून दुसरे विमान घ्यावे लागले. ते सकाळी मोरोक्कोला पोहोचला होते, परंतु येथून पुन्हा त्यांची पुढील फ्लाइट संध्याकाळी होती. याच कारणामुळे एक दिवसाचा व्हिसा घेऊन मोरोक्को का फिरू नये, असा विचार त्यांनी केला.

शाहरुख खानमुळे मिळाला नाही व्हिसा
गुलशन ग्रोवरने पुढे सांगितले की, जेव्हा ते व्हिसा काउंटरवर पोहोचले, तेव्हा तिथे एक महिला अधिकारी होती. जिला त्यांनी व्हिसा मागितला. त्या अधिकाऱ्याने आधी त्यांना पाहिले आणि नंतर व्हिसा नाकारला. जेव्हा अभिनेत्याने त्याला याचे कारण विचारले, तेव्हा तिने सांगितले की, ‘तुम्ही शाहरुख खानला मारले, त्यामुळे तुम्हाला व्हिसा मिळणार नाही.’

व्हिसा ऑफिसरकडून हे ऐकल्यानंतर गुलशन ग्रोवरने तिला समजावून सांगितले की, त्यांनी शाहरुख खानला केवळ चित्रपटात मारले होते. ‘आम्ही दोघे खूप चांगले मित्र असून, तो माझ्या भावासारखा आहे,’ असे समजावूनही महिला अधिकाऱ्याने त्यांना व्हिसा दिला नाही. यावरून असे लक्षात येते की, शाहरुख खान बॉलिवूडमधील असा एक अभिनेता आहे, ज्याचे परदेशातही खूप चांगले चाहते आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
खऱ्या आयुष्यातही गुलशन ग्रोवर यांना बायका मानायच्या व्हिलन, हवाई सुंदरीने दिलेला शेजारी बसण्यास नकार
अबब! चाळीशी पार केलेली करिना आहे इतक्या कोटींची मालकीण, लाखोंच्या बॅग्सची करते खरेदी
कपूर घराण्याचे पाश तोडत केली बॉलिवूडमध्ये एन्ट्री; तर ‘या’ कारणामुळे बेबोने राकेश रोशन यांना दिला होता डच्चू

हे देखील वाचा