Monday, July 1, 2024

“मी दुःख व्यक्त करतो, तेव्हा लोक ‘डॉन ३’ बद्दल विचारतात”, ट्रोलर्सबद्दल फरहान झाला व्यक्त

गीतकार जावेद अख्तर यांचा मुलगा आणि प्रसिद्ध अभिनेता फरहान अख्तर हा सध्या सोशल मीडियापासून दूर झाला आहे. त्याने काही काळ त्यातून ब्रेक घेतला आहे. वडील जावेद यांच्याप्रमाणेच फरहानही अनेकदा सोशल मीडियावर आपले मत व्यक्त करतो. परंतु ट्रोल्समुळे त्रस्त असलेल्या फरहानने सोशल मीडियापासून दूर राहणे पसंत केले आहे. अलीकडेच सलमान खानचा भाऊ अरबाज खानच्या ‘पिंच पर्व २’ या शोमध्ये ही माहिती दिली.

अरबाज खानच्या ‘पिंच पर्व २’ या टॉक शोमध्ये कलाकार त्यांच्या व्यावसायिक आणि खासगी आयुष्याबद्दल चर्चा करताना दिसतात. अरबाज आपल्या शोमध्ये सोशल मीडियाचा आपल्या जीवनावर होणाऱ्या परिणामाविषयी बोलतो. एका प्रश्नाला उत्तर देताना फरहान म्हणाला की, “मी आजकाल सोशल मीडियावर सक्रिय नाही. मला सोशल मीडिया डिटॉक्सची गरज होती. एक वेळ होती जेव्हा मी भांडणात उतरायचो किंवा ट्रोल्सला उत्तर द्यायचो, पण गोष्ट अशी आहे की, एकतर तुम्ही अशा गोष्टींमध्ये अडकत राहा किंवा तुम्ही उत्तर देणे बंद करा. त्यावेळी असे वाटते की सोशल मीडियाच्या पलीकडे जीवन आहे, तुम्ही तिथून निघून जा.”

फरहानने शो दरम्यान बोलताना चाहते आणि ट्रोल्समधील फरक स्पष्ट केला. तो म्हणाला की, “चाहते कलाकारांचे निष्ठावंत असतात, पण ट्रोल्स एकनिष्ठ नसतात. प्रत्येकजण नेहमी नवीन लक्ष्य शोधण्याचा प्रयत्न करत असतो. ट्रोल्स नवीन असतात, ज्यांचा फक्त एक क्लिक बिटशी संबंध असतो. ते फक्त पंच मारत असतात, त्यानंतर तुम्ही शार्क बनता किंवा मासा बनता. त्याचा खंबीरपणे सामना केला पाहिजे, ट्रोल्सला प्रभावित न होता.”

“जेव्हा मी काही दुःखद बातम्यांवर शोक व्यक्त करतो, तेव्हा लोक मला ‘डॉन ३’ बद्दल प्रश्न विचारतात. त्यांना समजत नाही की कोणी मरण पावला आहे. किमान यावर प्रतिक्रिया तरी करू नये,” असे फरहान पुढे म्हणाला.

फरहान शेवटचा ‘तूफान’ या चित्रपटामध्ये झळकला होता. यात डोंगरी भागातील अजीज अली उर्फ अज्जू भाई नावाच्या एका गुंडाची खेळावरील प्रेरणादायी कहाणी दाखवली आहे. ही कहाणी अजीज अलीच्या बॉक्सिंगवर आधारित आहे. ज्याला आधी बॉक्सिंगमधून पाच वर्षासाठी बाहेर काढलेले असते. पण त्यानंतर तो पुन्हा तयारी करून बॉक्सिंगच्या रिंगणात उतरतो हे दाखवले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘स्पष्ट वय दिसतेय!’ म्हणून ट्रोल करणाऱ्याला सोनालीचा जोरदार पंच, म्हणाली…

-कोव्हिडमधून बरे झाल्यानंतर ‘अशी’ झाली होती रुबीनाची हालत; म्हणाली, ‘मी पुन्हा ५० किलो वजन…’

-नेहा कक्कर आहे गरोदर? ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये देणार गोड बातमी

हे देखील वाचा