Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

जेव्हा सेटवर दयाबेनला ‘ए पागल औरत’ बोलणे जेठालालला पडले होते भलतेच महाग!

प्रसिद्ध टीव्ही शो ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ बर्‍याच वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आला आहे. गेल्या १३ वर्षांपासून या शोने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. या शोच्या प्रत्येक पात्राने चाहत्यांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मग ते जेठालालची भूमिका करणारे दिलीप जोशी असोत किंवा दयाबेनची भूमिका करणारी दिशा वकानी असो. सर्वांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या शोमध्ये जेठालालने एक डायलॉग बोलला होता, ज्यावर बंदी घालण्यात आली होती.

शोमध्ये या अगोदर दिलीप जोशी ‘ए पागल औरत’ हा डायलॉग बोलत असत. त्यांचा हा डायलॉग वादात सापडला होता. ज्यामुळे नंतर तो शोमधून काढून टाकण्यात आला. जेठालालची भूमिका साकारणारे दिलीप जोशी यांनी या वादाबद्दल सांगितले. ज्यामुळे नंतर ते दुरुस्त केले गेले.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’चे अभिनेते दिलीप जोशी यांनी सांगितले होते की, “ए पागल औरत, हा डायलॉग मी सुधारीत केला होता. अशीच एक परिस्थिती सेटवर आली. सेटवर एक सीन करताना, दया एका गोष्टीवर प्रतिक्रिया देते आणि सीन करत असताना, माझ्या तोंडातून निघते, ‘ए पागल औरत, मतलब क्या कुछ भी बोल रही है’. परंतु नंतर काही स्त्रियांनी त्या डायलॉगवर आक्षेप घेतला आणि मला सांगण्यात आले की हे पुन्हा वापरू नका. मला स्वतः ला तो डायलॉग आवडत नव्हता.”

तसेच, या शोमध्ये दिलीप जोशी आणि दिशा वकानीची जोडी खूपच पसंत केली गेली आहे. दिशाने शो सोडूनही बराच काळ झाला आहे. शोमधून काही काळ ती प्रसूतीच्या रजेवर गेली होती. पण ती अजून परत आली नाही. चाहते ती परत येण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

हे देखील वाचा