Saturday, June 29, 2024

जेव्हा सोनू निगमने जुबिन नौटियालला केलं होतं रिजेक्ट, बरीच विनंती करूनही दिली नव्हती संधी

अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असे म्हणतात.आपल्या आयुष्यामध्ये आपण अनेक चुकांमधूनच पुढे जात असतो. अशात या चुका सुधारण्याची संधी मिळणे खूप गरजेचे असते. अशा संधीचे अनेकांनी सोने केले आहे. परंतु काहींना संधी दिली जात नाही. काही कारणांवरून त्यांना डावलले जाते. असाच काहीसा प्रकार गायक जुबिन नौटियाल बरोबर देखील घडला होता.

सुरांच्या दुनियेत स्वतः ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या जुबिनला एकदा सोनू निगमने रिजेक्ट केले होते. हो तुम्ही बरोबर ऐकताय. ‘रातां लंबियां’ आणि ‘लुट गए’ अशी अनेक सुपरहिट गाणी गाणाऱ्या या गायकाला सोनू निगमने एका ऑडिशनमध्ये रिजेक्ट केले होते. (When Jubin Nautiyal was rejected by Sonu Nigam, even after being told repeatedly, he was not given a chance…watch video)

हा किस्सा तेव्हाचा आहे जेव्हा जुबिन संगीताच्या दुनियेत अगदी नवखा होता. त्याने साल २०११ मध्ये ‘एक्स फॅक्टर इंडिया’ या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता. यासाठी तो जेव्हा सर्वप्रथम ऑडिशनला आला, तेव्हा त्याने ‘तुझे भुला दिया’ हे गाणं गायलं होत. त्यावेळी श्रेया घोषाल आणि संजय लीला भन्साळी यांच्यासह सोनू निगम असे तीन परीक्षक होते. श्रेया घोषाल आणि संजय लीला भन्साळी यांना जुबिनचे गाणे आवडले होते. परंतु सोनू निगमला हे गाणे आवडले नव्हते.

खाली दिसत आलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकू शकता की त्यावेळी जुबिन एवढाही वाईट गायला नव्हता. यावेळी श्रेया त्याला म्हणाली होती की, “तुझा आवाज खूप छान आहे. पण तुला अजून खूप मेहनत घ्यावी लागेल.” त्यानंतर संजय लीला भन्साळी म्हणतात की, “तुझा आवाज खरंच खूप छान आहे. मला आवडलं तुझं गाणं, तुझी पर्सनॅलिटी देखील छान आहे. सगळच चांगलं आहे, पण काही तरी कमी आहे.”

 

सोनू निगमची बोलण्याची वेळ येते, तेव्हा तो बाकीच्या दोन परीक्षकांशी बोलतो आणि म्हणतो की, “जुबिन सरळ सरळ सांगतो मला नाही आवडला तुझा आवाज. माझ्याकडून तुला नाही आहे.” या सर्वांवर जुबिन त्याचे मत मांडत म्हणतो की, “मला माहित आहे सर मी फार चांगला नाही गाऊ शकलो, पण मी चांगले गाण्याचा नक्की प्रयत्न करेन.”

यामध्ये त्याला सोनू निगमने जरी नाही म्हटले असले, तरी श्रेया आणि संजय यांनी त्याला होकार दिला होता त्यामुळे तो ‘एक्स फॅक्टर इंडिया’मध्ये सहभाग घेऊ शकला.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

बॉलिवूडचे ‘हे’ मोठे सिनेमे ठरले नुसताच फुसका बार, कमाईतून बजेट वसूल करणे देखील झाले मुश्किल

बॉलिवूडच्या ‘या’ दिग्गज अभिनेत्रींनी लग्नानंतर त्यांच्या यशस्वी चित्रपटांच्या करिअरला ठोकला रामराम

प्रायव्हेट जेटमध्ये मांडी घालून बसलेल्या प्रियांका चोप्राचा फोटो व्हायरल, नेटकरी म्हणाले, ‘खरी देसी गर्ल’

हे देखील वाचा