×

जेव्हा दारूच्या नशेत कपिल शर्मा पहाटे तीन वाजता पोहचला किंग खानच्या घरी, तेव्हा शाहरुख म्हणाला…

कपिल शर्मा मनोरंजनविश्वातील विनोदाचे मोठे नाव. आपल्या विनोदी बुद्धीच्या जोरावर त्याने संपूर्ण जगात स्वतःचे मोठे नाव निर्माण केले. कपिल जेवढा त्याच्या विनोदामुळे त्याच्या शोमुळे ओळखला जातो तेवढाच तो त्याच्या विविध किस्स्यांमुळे देखील ओळखला जातो. त्याचा शाहरुख खानशी संबंधित एक मजेशीर किस्सा इंडस्ट्रीमध्ये खूपच गाजला होता, तोच किस्सा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

View this post on Instagram

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

कपिलने हा किस्सा स्वतः त्याच्या नेटफ्लिक्सवरील स्टॅन्डअप शो ‘आई एम नॉट डन येट’ शोमध्ये सांगितला होता. हा किस्सा सांगताना तो म्हणाला, “माझी एक चुलत बहीण मुंबईमध्ये आली होती. तिने मला शाहरुख खानला भेटण्याची तिची इच्छा बोलून दाखवली. जेव्हा ती मला हे सांगत होती तेव्हा मी दारूच्या नशेत होतो. त्याच नशेत मी तिचे बोलणे ऐकले आणि थोड्या वेळाने शाहरुख खानच्या घरी पोहचलो. तेव्हा त्याच्या घरी पार्टी सुरु होती. मी ड्रायव्हरला सांगितले की गाडी आत घे ड्रायव्हरने देखील गाडी आत घेतली. त्याच्या सुरक्षा रक्षकांनी देखील आम्हाला जाऊ दिले, कदाचित त्यांना वाटले की मला बोलवले असेल. त्याच्या घरात गेल्यावर मला माझ्या चुकीची जाणीव झाली होती. मात्र तोपर्यंत शाहरुख खानचा मॅनेजर मला आत घेऊन गेला. तेव्हा मी नेकर घातले होते आणि पान खात होतो. मी आत गेल्यावर मला गौरी वाहिनी तिच्या मैत्रिणींसोबत बसलेल्या दिसल्या मी त्यांना हॅलो म्हणालो तेव्हा त्यांनी शाहरुख खान आत असल्याचा इशारा केला.”

View this post on Instagram

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

पुढे कपिल म्हणाला, “मी जेव्हा आत गेलो तेव्हा शाहरुख त्याच्या अंदाजात नाचत होता.त्याला पाहून मी आत गेलो आणि म्हणालो भाई सॉरी माझ्या बहीण आली आणि तिला तुमचे घर पाहायचे होते, घर ओपन होतो तर मी तिला घेऊन आलो. त्यावर शाहरुख म्हणाला की, “जर माझे बेडरूम खुले असते तर तू तिथे देखील असाच आला असता का?'” हा किस्सा पहाटे तीन वाजेच्या सुमाराचा होता. त्या पार्टीमध्ये कपिलने खूप एन्जॉय केले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post