Monday, July 15, 2024

अखेर शाहरुख खानला मध्यस्थी करून मिटवावे लागले होते करिष्मा आणि माधुरीचे भांडण, हे होते वादाचे कारण

‘धकधक गर्ल’ म्हटल की, माधुरी दीक्षित हे नाव आपसूक आपल्या डोळ्यासमोर येत. माधुरीने आपल्या कसदार अभिनयाने, घायाळ करणाऱ्या सौंदर्याने एक काळ चांगलाच गाजवला होता. हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ म्हणुनच माधुरी दिक्षितच्या कारकिर्दिची ओळख सांगितली जाते. अभिनयासोबतच माधुरीने आपल्या नृत्यकौशल्यानेही त्या काळात तरुणाईला वेड लावले होते. माधुरीच्या ठुमक्यांची त्या काळात इतकी चर्चा होती की, या बाबतीत माधुरीचा हात कोणीही धरु शकत नव्हते; मात्र एका चित्रपटादरम्यान माधुरी दीक्षितला दुसऱ्या एका अभिनेत्रीने डान्स करताना डिवचले होते ज्यामुळे जोरदार वाद झाला होता, नेमका काय होता तो किस्सा चला जाणून घेऊ.

९०च दशक गाजवणाऱ्या अभिनेत्रींमध्ये माधुरी दीक्षित (madhuri dixit) आणि करिश्मा कपूर (karishma kapoor) यांच नाव प्रामुख्याने घेतलं जातं. दोघीनींही त्या काळात आपल्या सदाबहार अभिनयाने चित्रपटसृष्टी दणाणून सोडली होती. दोघांच्या अभिनयाइतकीच त्यांच्या डान्सची आजही चर्चा केली जाते. आजही त्यांना अनेक कार्यक्रमात डान्स करण्यासाठी आग्रह केला जातो. यावेळी त्यांचा उत्साह एखाद्या नवोदित अभिनेत्रीला लाजवेल असाच असतो. दोघीही चित्रपटक्षेत्रातल्या त्या काळातल्या आघाडीच्या अभिनेत्री होत्या मात्र एका चित्रपटादरम्यान या अभिनेत्रींमध्ये डान्स करण्यावरुन अशी काही स्पर्धा रंगली की, शेवटी शाहरूख खानला मध्यस्थी करून हा वाद मिटवावा लागला होता.

Dil Toh Pagal Hai: 23 years later, here's why we think the movie was a typical Bollywood cliché and all wrong!

हा सगळा प्रकार घडला होता ‘दिल तो पागल है’ च्या चित्रीकरणादरम्यान. ९० च्या दशकातील प्रसिद्ध रोमँटिक चित्रपट म्हणुन ‘दिल तो पागल है’ च नाव घेतल जात. माधुरी दीक्षित आणि करिश्मा कपूरने या चित्रपटात प्रमूख भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटातील गाणी आणि डान्सची आजही चर्चा पाहायला मिळते. याच चित्रपटातील एका गाण्यादरम्यान हा सगळा वाद उभा राहिला होता. यावेळी माधुरी दीक्षित स्टेजवर नृत्य सादर करत होती, अगदी देहभान विसरुन ती डान्स करण्यात दंग झाली होती. खाली उभे असलेले इतर मंडळीही तिचा हा डान्स पाहत होती. सगळ्यांच्या नजरा फक्त माधुरीवर खिळल्या होत्या.

20 years of Dil To Pagal Hai: Can you answer these 13 questions about the film? | Bollywood - Hindustan Times

त्याचवेळी तिथे करिश्मा कपूर येते आणि हा सगळा प्रकार पाहते. माधुरी एकटी डान्स करतेय आणि सगळे तिला पाहतायत हे काही तिला आवडत नाही. ती रागाने लाल होऊन स्टेजवर चडते आणि डान्स करायला सुरुवात करते, माधुरीही तिच हसून स्वागत करते मात्र रागाने लाल झालेली करिश्मा एक आव्हन म्हणुनच डान्स करायला लागते आणि माधुरीला डिवचते. यावेळी खाली उभ्या असलेल्या शाहरुख खानला हे प्रकरण हाताबाहेर जात असून वाद होण्याची शक्यता आहे याची जाणीव होते आणि तो मंचावर जातो. यामुळे करिश्मा कपूर शांत होते आणि हा वाद मिटतो.

Karisma Kapoor reveals she almost turned down Dil To Pagal Hai because of Madhuri Dixit - Television News

दरम्यान १९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात माधुरी दीक्षित, शाहरुख खान, करिश्मा कपूर यांच्या भूमिका असलेला हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटासाठी करिश्मा कपूरला सर्वोत्कृष्ठ सहाय्यक अभिनेत्रीची , शाहरुख खानला सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याचा तर माधुरी दीक्षितला सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.

हेही वाचा :

हे देखील वाचा