Sunday, July 14, 2024

‘या’ अभिनेत्यासाठी टॉपच्या अभिनेत्री असलेल्या करिश्मा कपूर आणि रवीना टंडन यांच्यात झाले होते टोकाचे भांडण

बॉलिवूड मधल्या अभिनेत्री नेहमीच चित्रपटांव्यतिरिक्त त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठी आणि इंडस्ट्रीमधील त्यांच्या कॅट फाईटसाठी ओळखल्या जातात. ‘कॅट फाईट’ हा शब्द आपण आता आता जरी ऐकायला सुरुवात केली असली तरी ही कॅट फाईट फाईट फार पूर्वीपासून इंडस्ट्रीमध्ये सुरु आहे. कॅट फाईट म्हणजे दोन अभिनेत्रींमधील भांडणं. या कॅट फाईटबद्दल अनेकदा मीडियामध्ये वेगवेगळ्या बातम्या येत असतात. कधी फीवरून, कधी चित्रपटांवरून, कधी ड्रेसवरून मात्र ९० च्या दशकात तर दोन अभिनेत्रींमध्ये चक्क बॉयफ्रेंडवरून भांडणं झाल्याची घटना घडली होती.

Photo Courtesy: ScreenGrab/YouTube/ultra

बॉलिवूडमध्ये ९० च्या दशकात एक असा लव्ह ट्रँगल तयार झाला. ज्याची चर्चा इंडस्ट्रीसोबतच मीडियामध्ये देखील खूपच रंगली. किंबहुना आजही अनेकदा त्या लव्ह ट्रँगलच्या बऱ्याच चर्चा होताना दिसतात. हा लव्ह ट्रँगल होता अजय देवगन (Ajay Devgan), रवीना टंडन (Raveena Tandon) आणि करिश्मा कपूर (Karisma Kapoor) यांचा. असे सांगितले जाते की, अजय देवगण ९० च्या दशकात रवीनाला सोडून करिश्मा कपूरच्या प्रेमात पडला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार रवीना टंडन आणि अजय देवगण एकमेकांच्या प्रेमात होते. त्या काळात अनेक हिट चित्रपटांमध्ये ही जोडी झळकली होती. सोबत काम करताना ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि एकमेकांसाठी वेडे झाले होते. मात्र काही काळानंतर अजय आणि करिश्मा कपूर एकत्र काम करू लागले आणि तेव्हाच अजय करिश्माकडे आकर्षित झाला. त्यावेळी मीडियामध्ये अजय देवगण आणि करिश्मा कपूर एकमेकांना डेट करत असल्याच्या अनेक बातम्या छापल्या जाऊ लागल्या. जेव्हा या बातम्या रवीनापर्यंत पोहचल्या तेव्हा तिला हे सहन झाले नाही आणि तिने करिश्मा कपूरचा दुस्वास करायला सुरुवात केली.

Photo Courtesy: Instagram/ajaydevgn

त्यावेळी करिश्मा कपूर आणि रवीना टंडन (Karisma Kapoor and Raveena Tandon) यांनी एकमेकींच्यासोबत राजकुमार संतोषी यांचा ‘अंदाज अपना अपना’ हा सिनेमा देखील साईन केला होता. असे म्हटले जाते की, या सिनेमाच्यावेळी दोघी एकमेकींसोबत बोलत देखील नव्हत्या. त्यामुळे सिनेमाचे दिग्दर्शक असलेल्या राजकुमार संतोषी यांना हा सिनेमा पूर्ण करण्यासाठी खूपच त्रास सहन करावा लागला. त्याकाळात या दोघींच्या बातम्या मीडियामध्ये तुफान गाजत होत्या. एका गाण्याच्या शूटिंग दरम्यान तर या दोघींमध्ये हाथापाई होण्यापर्यंत भांडण झाले. एका चित्रपटातील एका गाण्यात दोघींना सोबत डान्स करायच्या होता. त्यावेळी हे भांडण झाले होते. एवढे होऊनही अजय देवगणने कधीही रवीना टंडन आणि करिश्मा कपूरसोबतचे नाते सर्वांसमोर स्विकारले नाही. त्यानं त्या दोघींना फक्त चांगल्या मैत्रिणी म्हटले होते.

हेही वाचा-

हे देखील वाचा