बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांनी बरेच उत्कृष्ट चित्रपट केले आहेत. त्यांची प्रसिद्ध टीव्ही मालिका ‘महाभारत’ पाहत आपल्यातील बरेच जण मोठे झाले आहेत. चित्रपटात इतके मोठे नाव कमावणाऱ्या चोप्रा यांना कधीही चित्रपटसृष्टीचा भाग व्हायचे नव्हते. त्यांना आयसीएसची परीक्षा उत्तीर्ण करून अधिकारी व्हायचे होते. पण त्यांच्या नशीबात मात्र काहीतरी वेगळंच लिहिलं होतं.
बी. आर. चोप्रा लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होते. विद्यापीठात आयसीएस परीक्षेसाठी त्यांची निवडही झाली होती. परंतु पेपरच्या काही ८-१० दिवसांपूर्वी त्यांना टाइफाइड झाला. आजारपणातही ते परीक्षा देण्यासाठी पोहोचले.
तिथे त्यांना ३ तासांत १८ पैकी ८ प्रश्नांची उत्तरे द्यायची होती. परंतु त्यांनी सर्व १८ प्रश्नांची उत्तरे दिली. दुसऱ्या पेपर दरम्यान त्यांची तब्येत इतकी खराब झाली की, ते परीक्षा द्यायला जाऊ शकले नाहीत. असे म्हणतात की, नशिबापेक्षा जास्त आणि वेळेच्याआधी कोणाला काही मिळत नाही. बी. आर. चोप्रा यांच्या बाबतीतही असेच काहीसे घडले.
आयसीएसची परीक्षा न देण्याचे बी. आर. चोप्रा यांना इतके दु:ख झाले की, त्यांनी ठरवले जर आपण उच्च पातळीवरील सरकारी नोकरी करू शकत नाही, तर इतर कोणतीही सरकारी नोकरी करणार नाही. यानंतर ते लाहोरला गेले आणि इंग्रज पत्रकार बनले. स्वातंत्र्यानंतर ते चित्रपटसृष्टीकडे वळले आणि इथे त्यांनी यश मिळवले.
त्यांनी आतापर्यंत ‘भूतनाथ’, ‘निकाह’, ‘छोटी सी बात’, ‘बागबान’, ‘वक्त’, ‘गुमराह’ यांसारखे अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-