बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींमुळे चर्चेत असते. अरबाज खान आणि मलायका अरोरा आज विभक्त झाले असले, तरी त्यांच्यात मैत्री अजूनही कायम आहे. तसेच त्यांची प्रेमकथा अजूनही चाहत्यांसाठी चर्चेचा विषय बनते. या दोघांनीही 24 वर्षे एकत्र घालविली. त्यानंतर वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी त्यांचे मार्ग वेगळे करण्याचा निर्णय घेतला. मात्र घटस्फोटामागील खरे कारण काय होते, हे आजपर्यंत स्पष्ट झालेले नाही. तरी मलायका असे म्हणताना दिसली आहे, की त्यांच्या नात्यात आनंद राहिला नव्हता.
पण कदाचित तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, की मलायकाने स्वतः अरबाजला लग्नासाठी प्रपोज केले होते. या दोघांची प्रेमकथा एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नव्हती. 1993 मध्ये फोटोशूटसाठी दोघे पहिल्यांदाच भेटले होते. हे फोटोशूट एका कॉफी ब्रँडच्या जाहिरातीसाठी केले जात होते, त्यादरम्यान ते दोघेही एकमेकांवर फिदा झाले.
तब्बल 5 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतरही अरबाज खानने तिला लग्नासाठी प्रपोज केले नाही. यामुळे मलायका स्वत:हून पुढे झाली आणि त्याला प्रपोज केले. याचा खुलासा मलायकाने स्वतः कपिल शर्माच्या शोमध्ये केला होता. तिने सांगितले की, “जेव्हा अरबाजला प्रपोज केले, तेव्हा त्याने हो म्हणायला काहीच वेळ घेतला नाही. तो म्हणाला की, तू फक्त मला तारीख आणि वेळ सांग, मी येईल.”
सन 1999 मध्ये दोघांनी लग्न केले. त्यांनी मुस्लिम आणि ख्रिश्चन रीतिरिवाजांनुसार लग्न केले. लग्नाच्या 4 वर्षानंतर 2002 मध्ये मलायकाने मुलगा अरहानला जन्म दिला.
लग्नाच्या 19 वर्षानंतर दोघांचा काही कारणास्तव वाद झाला. 2017 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला आणि दोघेही विभक्त झाले. मात्र घटस्फोटानंतरही दोघांचे चांगले संबंध आहेत. सध्या मलायका अर्जुन कपूर आणि अरबाज जॉर्जियाला डेट करत आहे. तर मुलगा अरहान आई मलायकासोबत राहतो.
मलायका सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती सतत काहीतरी पोस्ट करत राहते. मलायकाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर तिला अखेरच्या वेळेस डान्स रिअॅलिटी शो ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ मध्ये जज म्हणून पाहिले गेले होते. याशिवाय गीता कपूर आणि टेरेंस लुईस यांच्या शोमध्ये ती जज होती.