Friday, July 5, 2024

जेव्हा रफी साहेबांच्या गळ्यातून गाणं गाताना आला होते रक्त, सतत १५ दिवस केला होता रियाज

भारतीय संगीतविश्वातील सर्वात मोठे नाव म्हणजे दिवंगत गायक मोहम्मद रफी. आज भेळेची रफी साहेब आपल्यात नाही, मात्र नेहमीच ते त्यांच्या सदाबहार गाण्यांमधून त्यांच्या असण्याची चाहूल सर्वाना देत असतात. त्यानी त्यांच्या करियरमध्ये अगणित हिट गाणी गेली. त्यांच्या करियरमध्ये असे अनेक किस्से घडले जे तुफान गाजले. रफी साहेब हे आजही अनेक नवोदित गायकांचे दैवत आहे. गायनाचे विद्यापीठ म्हणून देखील त्यान्ची गाणी ओळखली जातात. आज आम्ही तुम्हाला त्यांच्या करियरमधील असाच एक भन्नाट किस्सा सांगणार आहोत. कदाचित हा किस तुम्ही ऐकला नसेल.

मोहम्मद रफी यांना पंजाबी सिनेमा ‘गुलबलोच’मध्ये पहिला ब्रेक मिळाला. संगीतकार नौशाद आणि हुस्नलाल भगतराम यांनी रफी यांच्यामध्ये असलेली प्रतिभा ओळखली आणि त्यांना संधी दिली. पुढे खय्याम यांना देखील रफी साहेबांची गायकी आवडली आणि त्यांनी त्यांना ‘बीवी’ या सिनेमात संधी दिली. एका बातमीनुसार मोहम्मद रफी यांच्याबद्दल खय्याम साहेबानी एक आठवण सांगितली होती. ते म्हणाले, “१९४९ रोजी माझी त्यांच्यासोबत पहिली गजल रेकॉर्ड झाली. ही गजल वली साहेबानी लिहिली होती. गजलचे बोल होते, ” ‘अकेले में वह घबराते तो होंगे, मिटाके वह मुझको पछताते तो होंगे’. सुंदर बोल आणि त्यात रफींचा आवाज वा. मला जसे अपेक्षित होते त्यानी देखील तसेच गायले.” बैजू बावरा सिनेमानंतर रफी साहेबांचे नशीब बदलले आणि त्यांनी कधीच मागे वळून पहिले नाही.

केएल सहगल त्यांच्या काळातील प्रसिद्ध गायक होते. असे सांगितले जाते की, एका स्टेज शो दरम्यान लाईट गेल्यामुळे जेव्हा त्यांनी गाण्यास नकार दिला, तेव्हा १३ वर्षाच्या रफी साहेबांनी ते स्टेज सांभाळले. इथूनच त्यांच्या करियरला सुरुवात झाली. बैजू बावरा या सिनेमातील एका गाण्याच्या बाबतीत घडलेला एक किस्सा खूपच गाजला. या सिनेमातील ‘ओ दुनिया के रखवाले’ हे गाणे खूपच हिट झाले. हे गाणे गाण्यासाठी रफीनी १५ दिवस रियाज केला. त्यांनी अनेक टेक घेत हे गाणे रेकॉर्ड केले. जेव्हा हे गाणे पूर्ण झाले, तेव्हा त्यांचा आवाज असा तुटला की लोकांनी सांगितले की आता ते पुन्हा गाणे गाऊ शकणार नाही. हे गाणे गाताना त्यांच्या गळ्यातून रक्त देखील आले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा
सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नावर कंगना रनौतची प्रतिक्रिया; म्हणाली, ‘इंडस्ट्रीमध्ये कदाचितच खरं प्रेम…
सिद्धार्थ मल्होत्राला बळजबरी कियारा अडवाणीला करावा लागलं होतं किस, वाचा तो रंजक किस्सा

हे देखील वाचा