Monday, July 1, 2024

Controversies | विवादांशी आहे जुनं नातं, आई-वडिलांबद्दल रणबीर कपूरने केलं होतं ‘मोठ्ठं’ वक्तव्य

बॉलिवूडमधील प्रसिद्ध ‘कपूर घराण्याचा’ नातू रणबीर कपूर (Ranbir Kapoor) अभिनेता झाल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असतो. अभिनेता मीडियाच्या चकचकीपासून दूर राहणे पसंत करत असला, तरी अनेकदा त्याने दिलेल्या मुलाखती किंवा विधानांमुळे तो वादांमध्ये अडकतो. सध्या तो त्याच्या लग्नामुळे खूप चर्चेत आहे. या लेखात जाणून घेऊया रणबीरशी संबंधित काही वादांबद्दल…

निकोटिनवर वक्तव्य
‘संजू’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्याने केलेल्या एका गोष्टीमुळे तो वादात सापडला होता. स्वतःच्या व्यसनाबद्दल बोलताना रणबीरने २०१८ साली एका मासिकाला सांगितले होते की, वयाच्या १५व्या वर्षापासून त्याला निकोटिनचे व्यसन लागले होते. अभिनेत्याने कबूल केले होते की, तो चार महिन्यांसाठी धूम्रपान सोडेल, परंतु पुन्हा सिगारेट ओढेल आणि हे त्याचे सर्वात वाईट व्यसन आहे. (when ranbir kapoor statements turned into controversies)

ऋषी कपूर आणि नीतू कपूरच्या नात्यावर वक्तव्य
ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांच्या मृत्यूपूर्वी आपल्या आई-वडिलांच्या बिघडत चाललेल्या नात्याबद्दल खुलेपणाने सांगितले. २०११ मध्ये, अभिनेत्याने मीडियाला सांगितले होते की, “त्या दिवसांत कधीकधी त्यांच्यातील भांडण इतके वाढायचे की, त्याचा थेट परिणाम माझ्यावर झाला. मी पायऱ्यांवर सकाळी पाच-सहा वाजेपर्यंत माझे डोके माझ्या गुडघ्यांमध्ये ठेऊन बसत असे आणि भांडण थांबण्याची वाट बघायचो. माझ्या आई-वडिलांचे नाते खूप दिवसांपासून वाईट चालले होते आणि मी तिथे असल्यामुळे त्यांच्यात अडकलो होतो. माझ्या आईला नेहमी वाटायचे की, आम्हा दोघांना याचा त्रास होऊ नये आणि ती नेहमी आमच्याशी मोकळेपणाने बोलायची. पण मला सांगायचे आहे की, मी प्रेमाने वाढलेले मूल नाही. मी स्वतः पाहिले आहे की, स्त्री आणि पुरुष यांच्यात किती समस्या असू शकतात.”

तुटलेल्या नात्यांवर केलं वक्तव्य
बरेच दिवस रणबीर कपूर त्याच्या नात्यांची चर्चा टाळत राहिला, पण शेवटी त्याने ते मान्य केले. तो म्हणतो की, “मी धोका दिला. माझ्या अज्ञानामुळे, अननुभवीपणामुळे मी ते केले.” प्रेमात अनेकवेळा धोका दिल्यानंतर अखेर रणबीरचे हृदय आलिया भट्टवर (Alia Bhatt) आले आहे.

व्हर्जिनिटीवर वक्तव्य
अनेक वर्षांपूर्वी रणबीर कपूरने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत खुलासा केला होता. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्याने एकदा खुलासा केला होता की, तो अवघ्या १५ वर्षांचा असताना त्याने त्याची व्हर्जिनिटी गमावली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा