Saturday, July 6, 2024

अफगाणी असल्यामुळे वरीना हुसैनला करावा लागलाय ट्रोलिंगचा सामना; ट्रोलर्स म्हणायचे, ‘आतंकवाद्यांच्या देशातून आलीये’

बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळावी, अशी भारतीयांप्रमाणेच इतर देशातील तरुण- तरुणींची इच्छा असते. बॉलिवूडमध्ये झळकण्यासाठी लागणारी सर्व मेहनत घेण्यासही ते तयार असतात. आपल्या अभिनयाच्या जोरावर आपल्याला एक वेगळी ओळख मिळावी व आपले नाव व्हावे, यासाठी ते अपार कष्ट करत असतात. अशातच इतर देशांमध्ये, प्रामुख्याने अफगाणिस्तान किंवा पाकिस्तान मधून आलेल्या कलाकारांना दिग्दर्शक काम द्यायला टाळाटाळ करतात. याची वरीना हुसैनला चांगलीच प्रचिती आली आहे.

वरीना ही मूळची अफगाणिस्तानची आहे. तिने बॉलिवूडमध्ये आपली ओळख बनवण्याचे ठरवले होते. परंतु ती अफगाणी असल्याने अनेकांनी तिला चित्रपटांत काम देण्यास नकार दिला. सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा याच्यासह ‘लव्हयात्री’ या चित्रपटात अभिनेत्री पहिल्यांदा झळकली. परंतु या चित्रपटापर्यंत पोहोचतानाचा तिचा प्रवास फार कठीण होता. (when salman khan actress warina hussain trolled for being afghani unknown facts)

या चित्रपटात काम मिळवण्यासाठी तिला बरीच मेहनत करावी लागली. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत वरीना सांगते, “मी भारतात पहिल्यांदा आल्यानंतर चित्रपटांमध्ये काम करण्याचा प्रयत्न केला. मात्र तेव्हा मला फार ट्रोल केलं गेलं होतं. मी अफगाणिस्तानमधून आले म्हणून त्यांनी असं केलं असावं.” तसेच अभिनेत्रीचा जन्म अफगाणिस्तानमध्ये झाला व काबूलमध्ये तिचं घर आहे. या सर्वांमुळे सुरुवातीला तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं गेलं.

वरीना दिसायला खूप सुंदर आहे. तिचा जन्म २३ फेब्रुवारी रोजी काबूल येथे झाला. आपल्या करिअरची सुरुवात तिने मॉडेलिंग पासून केली. तिने न्यूयॉर्क फिल्म ऍकॅडमीमधून आपले शिक्षण पूर्ण केले. वरीनाचे वडील इराक, तर आई अफगाणिस्तानची आहे. वरीना आपल्या स्टायलिश फोटोंनी चाहत्यांची मने जिंकत असते. तिचे इंस्टाग्राम अकाउंटवर १.९ मिलियन फोलोव्हर्स आहेत.

वरीनाला सुरुवातीला तू आतंकवाद्यांच्या देशातून आली आहेस, तू चांगली नाहीस असे अनेक टोमणे मारले जात होते. वरीना म्हणते तिला लहानपणी तिच्या आजींनी व आईने अफगाणिस्तानच्या इतिहासातील काही गोष्टी सांगितल्या होत्या. अफगाणिस्तानात अनेक नागरिक हिंदी चित्रपट आवडीने पाहतात. तिचा बॉलिवूडचा आवडता अभिनेता सलमान खान आहे, असेही तिने सांगितले.

वरीनाची बॉलिवूडमधील कारकीर्द फार खास ठरली नाही. पहिला चित्रपट ‘लव्हयात्री’ फ्लॉप झाल्यानंतर ती ‘दबंग ३’ मधील ‘मुन्ना बदनाम हुआ’ या गाण्यात दिसली होती. आता ‘द इनकंप्लीट’ या चित्रपटासाठी तिचे काम सुरू आहे. तसेच अभिनेत्री आता कल्याण राम यांच्या सह साऊथ चित्रपटांमध्ये देखील झळकणार आहे, अशी माहिती समोर येत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आलिया भट्टला किस करताना दिसला रणबीर कपूर, ‘त्या’ फोटोमध्ये पाहायला मिळाली दोघांची रोमॅंटिक केमिस्ट्री

-‘सुपर डान्सर ४’च्या मंचावर शिल्पा शेट्टीचे दणक्यात स्वागत; सगळ्यांचे प्रेम पाहून अभिनेत्रीला अश्रू झाले अनावर

-Bigg Boss OTT : शमिता शेट्टी अन् राकेश बापट यांच्यामध्ये वादावादी, अभिनेत्रीने दिला डायपर घालण्याचा सल्ला

हे देखील वाचा