Tuesday, July 9, 2024

सलमान आणि अर्जून कपूरमधील वाद चव्हाट्यावर; कार्यक्रमात समोरासमोर आल्यावर जे केलं ते ‘व्हिडिओत कैद’

बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानची (Salman Khan) अर्जुन कपूरवर (Arjun Kapoor) असलेली नाराजी कोणापासून लपलेली नाहीये. जेव्हापासून अर्जुन आणि मलायका (Malaika Arora) यांच्यातील नात्याची पुष्टी झाली, तेव्हापासून सलमान आणि अर्जुन या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. महत्त्वाचं म्हणजे, ज्या दिवशी सलमान आणि अर्जुन समोरासमोर आले, त्यादिवशी त्यांच्या नात्यातला हा आंबटपणा स्पष्टपणे दिसून आला.

सोनम कपूरच्या रिसेप्शनचा व्हिडिओ आला समोर
सोनम कपूरचे (Sonam Kapoor) २०१८ साली लग्न झाले होते. या लग्नाला फिल्म इंडस्ट्रीतील मोठमोठे स्टार्स उपस्थित होते. अभिनेत्रीच्या रिसेप्शनमध्ये सलमान खानही पोहोचला होता. भाईजान घराच्या दारात पोहोचला, तेव्हा बोनी कपूरसोबत (Boney Kapoor) अर्जुन कपूरही होता. (when salman khan and arjun kapoor faced each other salman ignored him brutally)

सलमानही पोहचला पार्टीमध्ये
सोनम कपूरच्या रिसेप्शनमध्ये बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान खानची एन्ट्री खूपच प्रेक्षणीय होती. तो त्याच्या आगामी ‘रेस ३’ चित्रपटाच्या कलाकारांसह येथे आला होता. सलमानच्या उपस्थितीमुळे लग्नातील पाहुण्यांपासून ते मीडियापर्यंत सगळेच खूश होते, तर एक व्यक्ती अशी होती, ज्याला सलमानसमोर यायला किंवा त्याच्याशी नजर मिळवायला लाज वाटली. अर्जुनला पाहून असं वाटलं, जणू काय तो सलमानच्या येण्याने खूश नव्हता.

बोनी कपूरने केलं किस
आजही सलमान आणि अर्जुन एकमेकांना पसंत करत नसल्याचे या व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, सलमान रिसेप्शनमध्ये येताच त्याची पहिली भेट कॅटरिना कैफशी होते. अर्जुन कपूर आणि बोनी कपूर कॅटरिनाच्या जवळ उभे असलेले दिसत आहेत. अशा परिस्थितीत अर्जुन आणि सलमान दोघेही एकमेकांसमोर येणे टाळतात. दुसरीकडे, बोनी कपूर जेव्हा सलमानला भेटतात, तेव्हा त्यांनी सलमानच्या कपाळावर किस केले आणि अर्जुन कपूर तिथून निघून गेला.

हेही वाचा :

हे देखील वाचा