Thursday, December 4, 2025
Home बॉलीवूड असं काय घडलं की, सलमानला सात वेळा बदलावा लागला ब्रेसलेटचा स्टोन! का आहे इतका खास?

असं काय घडलं की, सलमानला सात वेळा बदलावा लागला ब्रेसलेटचा स्टोन! का आहे इतका खास?

बॉलिवूडचा दबंग सलमान खान (Salman Khan) वाढदिवसाआधीच एका अपघाताचा बळी ठरला आहे. अभिनेत्याला साप चावला होता. सुदैवाने हा साप विषारी नव्हता, त्यामुळे सलमानला कोणतीही हानी झाली नाही. याआधीही या अभिनेत्याने त्याच्यावर येणारे संकट टाळले आहे. आता हा चमत्कार आहे की, कुणाची प्रार्थना, हे माहीत नाही. पण या सगळ्या प्रसंगी सलमानच्या हातात नेहमीच ब्रेसलेट दिसत आले आहे.

या ब्रेसलेटशिवाय सलमान  क्वचितच दिसतो. त्याने एकदा त्याच्या एका चाहत्याला त्याची खासियत सांगितली होती. सलमान म्हणाला की, “माझे वडील ते घालायचे, त्यावेळी मी या ब्रेसलेटबरोबर खेळायचो आणि मग मी कामाला लागलो तेव्हा त्यांनी मला अगदी तसेच ब्रेसलेट दिले. या स्टोनला फिरोजा म्हणतात.”

सलमान हे ब्रेसलेट का घालतो?
पुढे सलमानने त्याच्या ब्रेसलेटमधील स्टोनबद्दल सांगितले. तो म्हणाला की, “जिंकलेले स्टोन दोनच प्रकारचे असतात. जेव्हा कोणतीही नकारात्मकता तुमच्याकडे येते, तेव्हा हा स्टोन सर्वात आधी त्या नकारात्मकतेला स्वतःकडे घेऊन जातो, त्यात शिरा तयार होतात आणि त्याला तडे जातात. हा माझा सातवा स्टोन आहे.”

एकदा सलमानचे हरवले होते ब्रेसलेट
सलमानसाठी या ब्रेसलेटला खूप अर्थ आहे. काही वर्षांपूर्वी सलमान त्याच्या पनवेलच्या फार्महाऊसवर त्याच्या मित्रांसोबत पार्टी करत असताना त्याचे ब्रेसलेट हरवले होते. त्यावेळी सलमानचा चेहरा उतरला होता, तो निराश झाला होता. जरी तो शांत राहिला आणि मित्रांसह ब्रेसलेट शोधू लागला. त्यानंतर अश्मित पटेलने स्विमिंग पूलमध्ये पडलेले ब्रेसलेट सलमानला दिले. ब्रेसलेट मिळताच सलमानचा चेहरा उजळला होता.

सलमान खान हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक असून, त्याने आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले. नुकताच काही दिवसांपूर्वी सलमानचा ‘अंतिम’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. जो मराठीतील ‘मुळशी पॅटर्न’चा रिमेक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे. सलमान सध्या ‘बिग बॉस १५’ होस्ट करत आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा