बॉलिवूडमधील अनेक कलाकारांची मोठी धुमधडाक्यातील लग्न पाहिली की सलमानच्या लग्नाचा विषय त्याच्या चाहत्यांच्या मनात हमखास येतोच. सर्वांची लग्न होत आहेत. पण बॉलिवूडचा भाईजान काही बाशिंग बांधायला तयार नाही. त्याचे निम्मे चाहते त्याच्या लग्नाची वाट पाहता पाहता आता आजी आजोबा झाले. परंतु सलमान काही लग्न करायचं नाव घेत नाहीये. अशात सध्या सोशल मीडियावर पुन्हा एकदा त्याच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे.
सोशल मीडियावर ‘बिग बॉस’च्या तेराव्या पर्वाचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यामध्ये काजोल आणि अजय देवगण दिसत आहेत. हे दोन्ही कलाकार सलमानला त्याच्या प्रेयसीवरून एक प्रश्न विचारतात. सलमान देखील त्याचे मजेशीर उत्तर देत बालपणीचा किस्सा सांगतो. हा किस्सा ऐकून भाईजानच्या लग्नावरून आणि तो आता आजोबा झाला असता अशा गोष्टींवरून एकच हशा पिकतो. सर्वजण सेटवर हसत असतात. (when salman said he would have been a grandfather by now and narrated incident of his childhood crush in bigg boss 13 video viral)
अनेक दिवसांनंतर सलमानचे लग्न पुन्हा एकदा या व्हिडिओमुळे चर्चेत आले आहे. त्याच्या चाहत्यांना पुन्हा एकदा त्याच्या लग्नावरून चर्चेचा विषय मिळाला आहे. यामध्ये काजोल आणि अजय देवगण सलमान बरोबर खरे बोलण्याचा एक खेळ खेळत असतात. त्याला एका खुर्चीवर बसवले जाते. मग काजोल त्याला प्रश्न विचारत म्हणते की, “तुम्ही कधी कोणत्या मुलीच्या प्रेमात पडला आहात का आणि तुम्ही हे तिला सांगितले आहे का?” यावर सलमान भुवया उंचावत म्हणतो की, “हो” त्याचे हो ऐकून सर्व चकित होतात. सलमान आता कुणाचे नाव घेणार हे कान देऊन ऐकतात. पुढे तो सांगतो की, “मी लहान असताना मला एक मुलगी खूप आवडायची. पण मला नेहमी भीती वाटत होती की ती मला नाकारेल. मला तिच्या बरोबर लग्न देखील करावे वाटतं होते. पण मी हे तिला कधीच सांगितले नाही. ही गोष्ट १० ते १५ वर्षांआधीची आहे. पण नशीब मी तिला काही बोललो नाही. नाहीतर मी आता आजोबा असतो.” त्याचा हा किस्सा ऐकून सर्वजण पुन्हा हसू लागतात. परंतु त्याने यामध्ये त्या मुलीच्या नावाचा उल्लेख केला नाही.
तसे पहिले, तर आतापर्यंत सलमानचे ऐश्वर्या रायपासून ते कॅटरिना कैफपर्यंत अनेक मोठ्या अभिनेत्रींबरोबर नाव जोडले गेले आहे. परंतु त्याच्या प्रेमाचे जहाज अद्याप काही पाण्यात उतरलेच नाही. अनेकवेळा त्याच्या प्रेमावरून त्याला मोठ्या वादामध्ये देखील अडकावे लागले आहे. तसेच त्याचे कुटुंबीय देखील त्याला लग्नाचा आग्रह करतात, परंतु तो अजूनही लग्नाला तयार नाही. अनेक दिवसांनंतर आता सलमान पुन्हा एकदा ‘बिग बॉस’च्या पंधराव्या पर्वात झळकणार आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-कोणी म्हणतंय ‘रावणाचा ड्रेस’, तर कोणी ‘पक्षीराज’; विचित्र आउटफिटमुळे ट्रोल झाली उर्वशी
-राज कुंद्राच्या सुटकेनंतर गहना वशिष्ठने शेअर केली पोस्ट; म्हणाली, ‘तू खूप…’










