Monday, June 9, 2025
Home बॉलीवूड जेव्हा शाहरुख खानने पकडला होता प्रियांका चोप्राचा गळा तेव्हा …, स्वतः प्रियांकाने सांगितला किस्सा

जेव्हा शाहरुख खानने पकडला होता प्रियांका चोप्राचा गळा तेव्हा …, स्वतः प्रियांकाने सांगितला किस्सा

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्ये तिच्या अभिनयाचा डंका वाजवला आहे. प्रियांकाने बॉलिवूडमध्ये आणि हॉलिवूडमध्ये स्वबळावर तिचे स्थान निर्माण करत संपूर्ण जगात ओळख निर्माण केली. सध्या प्रियांका बॉलिवूडपेक्षा असत हॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. तिने तिच्या अभिनयाची अशी छाप सर्वांवर सोडली की आज ती सर्वच निर्माता, दिग्दर्शकांची पहिली पसंत आहे.

सुरूवातीच्या काळात तिने भरपूर सहायक भूमिका केल्या. सलमानपासून शाहरुख, अक्षय आदी सर्वच टॉपच्या अभिनेत्यांसोबत काम केले. मात्र शाहरुख खानसोबत काम करताना प्रियंकाला एक असा अनुभव आला जो ती कधीही विसरू शकत नाही. प्रियांकाने एका मुलाखतीमध्ये तिचा हा अनुभव सर्वांना सांगितला. प्रियांका शाहरुखसोबत डॉन २ सिनेमाचे चित्रीकरण करत होती. त्यावेळी तिला एक अनुभव आला. हा अनुभव संगीताला ती म्हणाली की, “मी शाहरुखसोबत डॉन २ चित्रपटाचे शूटिंग करत होती. एक सीनमध्ये शाहरुखला माझा गळा पकडायचा होता. तो सीन करताना त्याने इतक्या जोरात माझा गळा पकडला की मी एकदम घाबरून गेली. आणि त्यात मी माझे सर्व संवाद विसरली. मला प्रयत्न करूनही माझे संवाद आठवत नव्हते. शाहरुख खानच्या प्रभावी अभिनयाचा हा परिणाम झाला असावा.”

Photo Courtesy YouTubeScreenGrabLyubovia

यावेळी प्रियांकाने सांगितले की तिने जेव्हा ऋतिक रोशनचा अभिनय पहिला तेव्हा तर तिला रडू आले होते. या मुलाखतीमध्ये प्रियांकाने शाहिद कपूरबद्दल देखील सांगितले ती म्हणाली, “मी आणि शाहिद मित्र असण्यासोबतच शेआजरी देखील होते. म्हणूनच जेव्हा माझ्या घरी इन्कम टॅक्सची टीम आली होती तेव्हा मी सर्वात आधी शाहिदला बोलावले होते. मात्र या घटनेला तोडून मीडियामध्ये छापण्यात आले. मला शाहिदचा अभिनय खूप आवडतो. कमीने सिनेमातील त्याचा अभिनय पाहून मी भारावून गेली होती.”

प्रियंकाचे नाव अनेक कलाकारांसोबत जोडले गेले. मात्र तिने २०१८ साली अमेरिकन अभिनेता आणि गायक असणाऱ्या निक जोनाससोबत लगीनगाठ बांधली. आज हे लोकप्रिय कपलपैकी एक आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘असे’ केल्यास प्रियांका चोप्राला बसू शकतो पती निकचा मार, स्वतः केला खुलासा

-बॉलिवूडमध्ये १४ वर्ष पूर्ण केलेल्या रणबीर कपूरने नाकारले होते ‘हे’ सहा सुपरहिट सिनेमे

-नोरा फतेहीचे ‘कुसु कुसु’ गाणे प्रदर्शित, डान्स मूव्ह्जने चुकवला रसिकांच्या काळजाचा ठोका

हे देखील वाचा