Thursday, July 18, 2024

किंग खानच्या ‘या’ चुकीवर भडकले होते त्याचे कुटुंबीय, मुलांनीही नव्हती दिली वडिलांना साथ

शाहरुख खानला (Shahrukh Khan) बॉलिवूडचा किंग खान म्हटले जाते. शाहरुख खानची क्रेझ प्रत्येकाच्या मनात पाहायला मिळते. पण शाहरुखच्या मनावर हक्क गाजवणारी माणसे म्हणजे त्याचे कुटुंबीय. शाहरुख खानला फॅमिली मॅन म्हटले जाते. तिन्ही मुलांसह त्याची पत्नी गौरी खानवर (Gauri Khan) त्याचे अपार प्रेम आहे. पण अभिनेत्याच्या आयुष्यात एक वेळ अशी आली, जेव्हा त्याच्या एका चुकीमुळे त्याचे कुटुंबीय त्याच्यावर भयंकर रागावले होते. होय, या चुकीमुळे त्याच्या मुलांनीही त्याची शाळा घेतली होती.

खरं तर, तुम्हाला शाहरुख खानचा तो वाद आठवतच असेल, ज्यात त्याने वानखेडे स्टेडियमवर गोंधळ घातला होता. शाहरुख जेव्हा वानखेडे स्टेडियमवर वाद घालताना दिसला, तेव्हा त्याची मुलेही त्याच्यासोबत उपस्थित होती. वानखेडे स्टेडियमवर शाहरुख खानने बीसीसीआय आणि एमसीएच्या अधिकाऱ्यांसोबत खूप गैरवर्तन केले होते. त्यामुळे त्याला स्टेडियमबाहेर काढण्यात आले आणि त्याच्यावर बंदी देखील घालण्यात आली होती. अभिनेत्याच्या या वृत्तीमुळे त्याला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले गेले, तसेच त्याच्या कुटुंबीयांनीही त्याला फटकारले होते. (when shahrukh khan family got angry over a mistake)

या घटनेबद्दल बोलत असताना, एकदा शाहरुख खानने त्याच्या मुलाखतीत त्याच्या घरातील काही गोष्टी उघड केल्या. यावेळी अभिनेत्याने सांगितले की, त्यावेळी तो खूप संतापला होता. तो खूप चिडला होता आणि त्याला अजूनही याबद्दल पश्चात्ताप आहे. शाहरुख म्हणाला, “पण त्यावेळी मला वाटले की, माझ्या मुलांसोबत गैरवर्तन केले जात आहे. त्यावेळी मी त्यांना सांगितले की, माझ्यासोबत माझी मुलेही आहेत आणि मी त्यांना घेऊन जात आहे. दरम्यान, त्या भांडणात एक व्यक्ती मला असे काही बोलला, त्यानंतर मी रागाने लाल झालो. मला माहित आहे की, मी असे करायला नको होते.” पुढे शाहरुखने असेही सांगितले की, जेव्हा तो स्टेडियममधून घरी गेला, तेव्हा त्याची पत्नीच नाही, तर मुलेही त्याच्यावर खूप चिडली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा