Saturday, June 21, 2025
Home टेलिव्हिजन इंटीमेट सीनवर शुभांगी यात्रेने मांडले मत म्हणाली, ‘मला यात काही अडचण नाही पण ही फक्त एक अट आहे’

इंटीमेट सीनवर शुभांगी यात्रेने मांडले मत म्हणाली, ‘मला यात काही अडचण नाही पण ही फक्त एक अट आहे’

‘भाबी जी घर पर हैं’ ही कॉमेडी मालिका २०१५ पासून प्रसारित होत आहे. या टीव्ही सिरीयलमध्ये एकापेक्षा एक कथा तर पाहायला मिळतातच पण त्यासोबतच जबरदस्त कॅरेक्टर्स देखील आहेत जे प्रेक्षकांचे खूप मनोरंजन करतात. या कॉमेडी मालिकेतील असेच एक पात्र म्हणजे अभिनेत्री शुभांगी अत्रे हिने साकारलेली ‘अंगूरी भाभी’. शुभांगीच्या आधी ही भूमिका अभिनेत्री शिल्पा शिंदेने साकारली होती.

शिल्पामुळेच अंगूरीचे पात्र घराघरात लोकप्रिय झाले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मात्र, फीबाबत निर्मात्यांशी वाद झाल्यानंतर शिल्पाने ही टीव्ही मालिका सोडली. यानंतर २०१६ मध्ये या मालिकेत अंगूरी भाभीची भूमिका साकारण्यासाठी शिल्पाच्या जागी शुभांगी अत्रेला आणण्यात आले. शुभांगी अत्रेने शिल्पा शिंदेला सिरियलमध्ये रिप्लेस करण्याची ही पहिलीच वेळ नाही.

याआधीही शुभांगीने २०१३ च्या टीव्ही सीरियल ‘चिडिया घर’मध्ये शिल्पाची जागा घेतली होती. मात्र, आज शुभांगी अंगूरी भाभीच्या भूमिकेत प्रेक्षकांना खूप पसंती मिळत आहे. आजच्या काही दिवसापूर्वी एका मुलाखतीत शुभांगीला विचारण्यात आले होते की, ती ऑनस्क्रीन इंटिमेट सीन देण्यात आरामदायी आहे का?

या प्रश्नाला उत्तर देताना शुभांगी म्हणाली होती की, ‘मला इंटिमेट सीन द्यायला काहीच हरकत नाही, फक्त ते सीन नीट चित्रित केले पाहिजेत आणि हे सीन पाहून माझ्या मुलीला आईने काय करावे असा प्रश्न पडू नये.’ आम्ही तुम्हाला सांगतो की, ‘भाबी जी घर पर हैं’ ने नुकतेच १७०० एपिसोड पूर्ण केले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा