Wednesday, April 23, 2025
Home अन्य इंडियाज बेस्ट डान्समध्ये दिसली टेरेंस-नोराची रोमॅंटिक केमिस्ट्री, ‘पहला पहला प्यार है’ गाण्यावर केला डान्स

इंडियाज बेस्ट डान्समध्ये दिसली टेरेंस-नोराची रोमॅंटिक केमिस्ट्री, ‘पहला पहला प्यार है’ गाण्यावर केला डान्स

बॉलिवूडची सर्वोत्कृष्ट नर्तक आणि अभिनेत्री नोरा फतेही तिच्या सुंदरतेने सर्वांना वेड लावत आहे. विशेषतः सुप्रसिद्ध कोरिओग्राफर टेरेंस लुईस तिच्या सौंदर्याने इतका प्रभावित झाला आहे की नोराचा चेहऱ्यावरून त्यांची नजर दुसरीकडे जातच नाही. टेरेन्सचा नोराबद्दलचा हा व्याकुळपणा तेव्हा समोर आला जेव्हा नोरा इंडियाज बेस्ट डान्सर मध्ये को-जज बनून आली होती.

वास्तविकत: मलायका अरोराला गेल्या वर्षी कोरोना झाल्याने काही काळ शोपासून दूर राहावे लागले होते, त्यामुळे नोरा फतेही तिच्या जागी आली होती. यावेळी, नोराने टेरेन्सच्या मनावर अशी जादू केली की तो तिच्यापासून आपली नजर हटवू शकला नाही. जेव्हा नोरा त्याच्यासमोर आली तेव्हा टेरेंसची नजर फक्त तिच्यावरच होती.

एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये आपण पाहू शकता की, नोरा तिच्या जजच्या खुर्चीवर बसायला पुढे सरकते. त्यानंतर ‘हम आपके हैं कौन’ या चित्रपटातील रोमँटिक गाणे ‘पहला पहला प्यार है’ ऐकून टेरेन्स स्वत: वरील नियंत्रण हरवुन बसतो आणि नोराला उचलून घेतो. हे पाहून नोरा तर आश्चर्यचकित होतेच पण इतर सर्वांनाही आश्चर्याचा धक्का बसतो.

जेव्हा व्हिडीओमध्ये नोराची एन्ट्री होते तेव्हा ती म्हणते की ‘तिने सर्वांची खुप आठवण काढली’. टेरेंस विचारतो की ‘तूला माझी आठवण आली का,’ याला नोरा ‘हो’ म्हणून उत्तर देते. शोमध्ये नोरा आणि टेरेंसच्या रोमँटिक केमिस्ट्रीला मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आणि त्यामुळे शोच्या टीआरपीमध्येही लक्षणीय वाढ झाली.

हे देखील वाचा