×

जेव्हा जादूगरने केली शिल्पा शेट्टीची उंची ४ फूट कमी, पाहून सगळेच झाले हैराण

टिव्ही रिऍलिटी शो ‘इंडियाज गॉट टॅलेंट’मध्ये स्पर्धक प्रत्येक दिवशी त्यांच्या टॅलेंटने सगळ्यांना हैराण करत आहेत. अशातच या शोचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यात एक मॅजेशीयन स्पर्धक बीएस रेड्डी या शोची परीक्षक शिल्पा शेट्टीची उंची जादूने छोटी करतो. रेड्ड ने ५ फूट ७ इंचाच्या शिल्पाची उंची १ फूट एवढी केली. हा व्हिडिओ नुकतेच यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित झाला आहे. जो पाहून सगळेच हैराण झाले आहेत.

बीएस रेड्डी यांनी या एपिसोडमध्ये जादू दाखवली आहे. परंतु या जादूची ट्रिक का पकडणे खूप अवघड गोष्ट आहे. शिल्पा शेट्टी आधी एका मुलीचे त्याने दोन तुकडे केले होते. त्यानंतर त्याने शिल्पा शेट्टीला बोलावले आणि एका लांब बॉक्समध्ये उभे केले. या बॉक्सवर स्केल देखील होती. ज्यामुळे शिल्पाची उंची कळत होती.

रेड्डीने सगळ्यांसमोर शिल्पा शेट्टीची उंची कमी केली. त्याने शिल्पाची उंची ४ फूट पेक्षाही कमी केली. यूट्यूबवर हा व्हिडिओ पाहून सगळेच हैराण झाले आहेत. अनेकजण कमेंट करत आहेत की, अशी जादू त्यांनी याआधी कधीच पाहिली नाही. शिल्पा शेट्टीने नुकतेच तिचा नवीन चित्रपट ‘सुखी’ची घोषणा केली आहे. ती मागील अनेक दिवसापासून चित्रपटसृष्टीपासून दूर राहिली आहे.

शिल्पाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून सगळ्यांना सांगितले की, ती ‘सुखी: या चित्रपटात काम करणार आहे. ही पोस्ट शेअर करून शिल्पाने लिहिले की, “थोडी बेधडक आहे. माझं आयुष्य एक उघडलेलं पुस्तक आहे. जग बेशरम करत असेल तरी काय झाले, कोणापेक्षाही माझी स्वप्न कमी नाहीत.” त्यांनी पंजाबमध्ये या चित्रपटाची शूटिंग चालू केली आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, विक्रम मल्होत्रा आणि शिखा शर्मा यांनी केले आहे. तसेच या चित्रपटात सोनल जोशीने दिग्दर्शनात पदार्पण केले आहे.

हेही वाचा :

Latest Post