Sunday, March 22, 2026
Home बॉलीवूड बॉलीवूडमधील ‘या’ अभिनेत्रीची अंडरवर्ल्ड डॉनला हवी होती एक रात्र, त्रासाला कंटाळून कायमची झाली गायब

बॉलीवूडमधील ‘या’ अभिनेत्रीची अंडरवर्ल्ड डॉनला हवी होती एक रात्र, त्रासाला कंटाळून कायमची झाली गायब

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी त्यांच्या काळात सौंदर्याने कहर केला होता. त्यांची एक झलक बघण्यासाठी देखील लाखो प्रेक्षक उत्सुक असायचे. यात ‘राम तेरी गंगा मैली’ मधील अभिनेत्री मंदाकिनी असो किंवा ‘पापा कहते हैं’ या चित्रपटातील मयुरी कांगो असो. या अभिनेत्री बॉलिवूडमध्ये त्यांच्या सौंदर्यानेने सर्वत्र चर्चित होत्या. परंतु काळानुसार या अभिनेत्रीनी चित्रपटसृष्टीला राम राम ठोकला. त्यानंतर त्यांचा काहीच ठाव ठिकाणा लागला नाही. आज आपण अशा एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत, जिने तिच्या सौंदर्याने एकेकाळी नाव कमावले होते. पण आता ती कुठे आहे या गोष्टीची माहिती कोणालाच नाहीये. आपण बोलत आहोत विराना चित्रपटातील अभिनेत्री जॅस्मिनबद्दल

बॉलिवूडमध्ये जॅस्मिनने ‘विराना’ या चित्रपटात काम करण्याआधी दोन चित्रपटात काम केले होते. या काळात असे म्हंटले जात होते की, अंडरवर्ल्ड डॉन जॅस्मिनच्या सौंदर्यावर फिदा झाला होता. तो दररोज तिला फोन करत होता. त्यावेळी त्याने जॅस्मिन सोबत एक रात्र राहण्याची देखील इच्छा व्यक्त केली होती. त्याने जॅस्मिनला एवढा त्रास दिला होता की, शेवटी त्याच्या त्रासाला कंटाळून ती हा देश सोडून गेली होती. त्यानंतर ती कोणाच्याच संपर्कात नव्हती.

त्यानंतर आजतागायत जॅस्मिनची कोणतीही बातमी आली नाही. काही लोक म्हणतात की, ती लग्न करून विदेशात गेली आहे, तर काहीजण म्हणतायेत तिचा मृत्यू झालाय. तिचे कोणतेही सोशल मीडिया अकाऊंट देखील नाहीये. त्यामुळे ती सध्या कुठे आहे आणि काय करते या बाबतीत कोणालाच नेमकी माहिती नाहीये.

अभिनेत्रीचे पूर्ण नाव जॅस्मिन भाटिया हे आहे. तसेच अनेक ठिकाणी तिच्या नावाचा उल्लेख जॅस्मिन धुन्ना असा देखील केला जातो. दिग्गज निर्माता आणि दिग्दर्शक एनडी कोठारी यांनी तिला त्यांच्या 1979 मध्ये आलेल्या ‘सरकारी मेहमान’ या चित्रपटातून लॉन्च केले होते. या चित्रपटात तिच्यासोबत विनोद खन्ना आणि अमजद खान होते.

हॉरर चित्रपटासाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री जॅस्मिनने तिच्या करीअरमध्ये ‘बंद दरवाजा’, ‘डाक बंगला’ आणि ‘पुराणी हवेली’ यासारख्या हॉरर चित्रपटात काम केले आहे. परंतु तिचा सर्वात चर्चित असणारा चित्रपट म्हणजे ‘विराना’.या चित्रपटाने तिला खरी ओळख दिली.

हे देखील वाचा