बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहे, त्यांनी अगदी थोडे चित्रपट करूनच चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला. यामध्ये बॉलिवूडमधील महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलेल्या अनेक अभिनेत्रीचा देखील समावेश होतो. या अभिनेत्रींनी त्यांच्या सौंदर्याने सगळ्यांच्या भुरळ घातली होती. नंतर या अभिनेत्री चित्रपट सृष्टीमध्ये कुठेच दिसेनाशा झाल्या. खरं तर प्रत्येकाच्या दृष्टीने सौंदर्याच्या व्याख्या खूप वेगवेगळ्या असतात. काहींच्या मते गोरा रंग म्हणजे सौंदर्य, लांब केस म्हणजे सौंदर्य, तर काहींच्या मते,चेहऱ्याची ठेवण म्हणजे सौंदर्य. पण या सगळ्यात नेहमीच सगळ्यांचं आकर्षणाचा विषय ठरतो तो तीळ. अशीच सौंदर्याने परिपूर्ण असलेली अभिनेत्री म्हणजे जीविधा शर्मा. जी आज चित्रपट सृष्टीपासून खूप लांब गेलीये, जाणून घेऊया तिच्याबद्दल.
जीविधा शर्मा हिने 2002 मध्ये ‘ये दिल आशिकाना’ या चित्रपटांमध्ये काम केले होते. या चित्रपटातील ‘उठा ले जाऊंगा’ आणि ‘ये दिल आशिकाना’ ही गाणी खूपच हिट झाली होती. त्या सोबतच सुपरहिट झाली होती, ती म्हणजे या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री जीविधा शर्मा. जीविधा शर्मा जेव्हा काळया रंगाचा ड्रेस घालून आली होती, तेव्हा अनेकजण तिला बघताच तिच्या प्रेमात पडले होते. तिच्या ओठाच्या खाली असणारा काळा तीळ तिची सर्वत्र ओळख बनला होता. पण त्यावेळी कुणालाही कल्पना नव्हती की, आपल्या सौंदर्याने आपल्या सगळ्यांना घायाळ करणारी अभिनेत्री लवकर चित्रपट सृष्टीपासून लांब जाणार आहे.
‘ये दिल आशिकाना’ या चित्रपटात करण नाथ हा मुख्य भूमिकेमध्ये होता. तो देखील एक काळानंतर चित्रपटसृष्टी पासून लांब गेला. या चित्रपटात तिने तिच्या अभिनयाने सगळ्यांची मने जिंकून घेतली. परंतु या चित्रपटातील दिग्दर्शकाची आणि निर्मात्यांची मने जिंकू शकली नाही. तिला चित्रपटसृष्टीमधून जास्त ऑफर येत नव्हत्या. ही त्या काळाची गोष्ट आहे, ज्यावेळी अमिषा पटेल, प्रीती झिंटा, ऐश्वर्या राॅय या अभिनेत्री चर्चेत होत्या. त्यामुळे या अभिनेत्रींमध्ये ती मागे राहिली. जेव्हा जीविधाला बॉलीवूडमध्ये जास्त यश मिळाले नाही, तेव्हा तिने तेलुगूमध्ये ‘युवारत्न’ या चित्रपटात काम केले. या चित्रपटात देखील ती खास यश मिळवू नाही शकली.
ही गोष्ट खूप कमी प्रेक्षकांना माहीत असेल की, ये दिल आशिकाना या चित्रपटाच्या आधी देखील जीविधाने ऐश्वर्या राॅय आणि अनिल कपूर यांच्या ‘ताल’ या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटात तिने ऐश्वर्या रॉयच्या बहिणीचे पात्र निभावले आहे. परंतु ऐश्वर्या राॅय पुढे तिच्याकडे जास्त कोणाचे लक्ष गेले नाही. त्यानंतर 2009 मध्ये जीविधाने ‘मिनी पंजाब’ या चित्रपटातून पंजाबी चित्रपट सृष्टीमध्ये प्रवेश केला. यामध्ये तिने ‘यार अनमुले’, ‘दिल ले गई कुडी पंजाबी दी’, ‘लायन ऑफ पंजाब’, ‘दिल साडा लुटिया गया ‘ या चित्रपटात काम केले.
1999 ते 2000 पर्यंत तिने तेलुगू, तमीळ आणि हिंदी चित्रपटात काम केले. चित्रपटात नंतर काम न मिळाल्याने तिने अनेक मालिकांमध्ये देखील काम केले. यामध्ये ‘तुम बिन कहा जाऊ’, ‘जमी से आसमा तक’ या मालिकांमध्ये काम केले. तसेच तिने सावधान इंडिया, फेअर फाइल्समध्ये देखील काम केले. एवढंच काय पण जीविधाने नंतर अनेक जाहिरातींमध्ये काम केले. परंतु चित्रपट सृष्टीमध्ये तिला जास्त यश न मिळाल्याने तीने चित्रपटांमध्ये काम करणे सोडून दिले.










