‘बिग बॉस १३’ मधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री आणि पंजाबी गायिका शहनाज गिल आज तिच्या आश्चर्यकारक परिवर्तनाने चाहत्यांची मने जिंकत आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर शहनाजने स्वतःमध्ये बरेच काही बदल केले आहेत. ज्याचे परिणाम अवघ्या सहा महिन्यांत दिसू लागले आहेत. पण आता ते बदल आपल्याला पाहायला मिळत आहेत. बिग बॉस फेम गोंडस गर्ल आता हॉट आणि सुंदर झाली आहे.
शहनाज गिलचे फोटो इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहेत, जे प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रत्नानीने काढले आहेत. फोटोंमध्ये शहनाजने स्कर्टसह ब्रालेट परिधान केले आहेत. टीव्ही शो ‘बिग बॉस’मधून प्रसिद्ध झालेल्या शहनाज गिलने तिचे काही ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत.
फोटोंमधील शहनाजचा लूक चाहत्यांना घायाळ करणारा आहे. तिचा मेकअप तिच्या सौंदर्यात आणखी भर घालत आहे. फोटोमध्ये शहनाजच्या लूकमुळे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. अभिनेत्री शहनाजचे इंस्टाग्रामवर ७.८ दशलक्षाहून अधिक फॉलवर्स आहेत. अभिनेत्री शहनाजने एक दिवसापूर्वी तिचे हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यावर ८ लाखांहून अधिक लाईक्सचा पाऊस पडला आहे.
शहनाजने फोटोंसह एक गोंडस कॅप्शनही लिहिले आहे. ती लिहिते, “जर तुम्ही चांगल्या दृष्टिकोणातून पाहिले, तर तुम्हाला संपूर्ण जग एका बागेसारखेच दिसेल.” फोटोंमध्ये अभिनेत्री खूप सुंदर दिसत आहे. शहनाजचे चाहते तिच्या फोटोवर कमेंट करून तिच्या क्यूट लूकचे कौतुक करत आहेत.
दरम्यान, शहनाज गिल छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘बिग बॉस १३’ मधून खूप चर्चेत आली. शहनाज गिलला या शोमधून खरी ओळख मिळाली. शहनाज आणि सिद्धार्थ शुक्लाच्या नात्याबद्दलही मनोरंजन विक्ष्वात चर्चा सुरू आहे. या दोघांचे चाहते त्यांना एकत्र पाहून खूप आनंदी आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-मुंबई पोलिसांकडून शर्लिन चोप्राची ८ तास चौकशी; राज कुंद्रावर लावले होते लैंगिक अत्याचाराचे आरोप
-हीना पांचाळचे ठुमके पाहून हरपले चाहत्यांचे भान; भन्नाट डान्स व्हिडिओ झाला व्हायरल