Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

विक्रांत मेसीसोबत लग्न करणारी शीतल ठाकूर नक्की आहे तरी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल सर्वकाही…

जगभरात व्हॅलेंटाईन डे साजरा केला गेला आहे. प्रेमाच्या या खास दिवशी, असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी व्हॅलेंटाइन डेला लग्न केले आणि सात आयुष्य एकत्र राहण्याचे वचन दिले. टीव्हीच्या दुनियेतून आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणारा अभिनेता विक्रांत मेसीनेही (Vikrant Massey) खास दिवशी लग्न केले आहे. विक्रांतला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. त्याने साकारलेल्या दमदार पात्रांच्या साहाय्याने तो इंडस्ट्रीत यशाची शिडी चढत आहे. आपल्या कामामुळे तो सतत चर्चेत असतो. मात्र यावेळी त्याच्या चर्चेत येण्याचे कारण त्याचे लग्न आहे. अभिनेत्याने १४ फेब्रुवारीला म्हणजेच व्हॅलेंटाईन डेला त्याची दीर्घकाळाची गर्लफ्रेंड शीतल ठाकूरसोबत लग्न केले. या जोडप्याने त्यांच्या वर्सोव्यातील घरी कोणत्याही धूमधडाक्याशिवाय नोंदणीकृत विवाह केला. ज्यामध्ये त्यांचे कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते.

लग्नाची बातमी समोर येताच आता विक्रांतच्या गर्लफ्रेंडपासून पत्नी बनलेल्या शीतल ठाकूरची (Sheetal Thakur) चर्चा सुरू झाली आहेत. सर्वांना जाणून घ्यायचे आहे की शीतल कोण आहे? चला तर मग जाणून घेऊया, कोण आहे विक्रांत मेसीची पत्नी शीतल.

धर्मशाला येथे झाला शीतलचा जन्म
शीतल ठाकूरला पर्वतांची कन्या म्हणणे चुकीचे ठरणार नाही. शीतलचा जन्म १३ नोव्हेंबर १९९१ रोजी हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे झाला. ती एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिच्या कुटुंबात त्याचे आई-वडील, आजी आणि एक लहान भाऊ आणि एक मोठी बहीण आहे.

अभ्यासासोबत मॉडेलिंगच्याही जिंकल्या अनेक स्पर्धा
शीतलने आपले सुरुवातीचे शिक्षण चंदीगड येथील सेंट झेवियर्स माध्यमिक विद्यालयात केले. नंतर दिल्ली विद्यापीठातून बी.टेक. कॉलेजमध्ये शिकत असताना शीतलने फेमिना मिस हिमाचल प्रदेशसह अनेक सौंदर्य स्पर्धा जिंकल्या. त्यानंतर तिला मॉडेलिंगच्या ऑफर्स येऊ लागल्या. शितलने शिक्षणानंतर इंजिनियर म्हणून नोकरी केली आणि त्यासोबतच तिने मॉडेलिंगचे प्रोजेक्टही साईन केले.

करिअर
शीतलने २०१२ मध्ये तिच्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. यादरम्यान तिने ‘एअरटेल, ई-फ्यूचर, सोनी एरिक्सन, होम शॉप १८, आयसीआयसीआय बँक अशा अनेक टीव्ही जाहिरातींसाठी शूटिंग केले. शीतल या ॲड शूट्सवर समाधानी नव्हती, तिला काहीतरी मोठे करायचे होते. काहीतरी मोठे करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने टीव्ही आणि चित्रपटांसाठी ऑडिशन देणे सुरू केले.

पंजाबी चित्रपटात केले पदार्पण
खूप ऑडिशन्स दिल्यानंतर तिला २०१६ मध्ये एका पंजाबी चित्रपटात ब्रेक मिळाला. ‘बंबूकाट’ चित्रपटात ‘सम्मी’ची भूमिका साकारून तिने आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर तिने ‘अपस्टार्टस’, ‘ब्रिज मोहन अमर रहे’ आणि ‘छप्पड फड के’ सारख्या वेबसीरिजमध्ये काम केले.

खूप हॉट आहे शीतल
विक्रांतची पत्नी आणि मॉडेल शीतल ठाकूर खूपच हॉट आहे. ती प्रत्येक रूपात परिपूर्ण दिसते. तिची बॉडी फिगर आणि ड्रेसिंग सेन्स अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

‘अशी’ झाली विक्रांतशी भेट
चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर शीतल आणि विक्रांतने २०१९ मध्ये साखरपुडा केला. या जोडप्याने त्यांचे नाते लपवून ठेवले होते. परंतु २०१७ मध्ये त्यांनी त्यांच्या नात्याचा खुलासा केला होता. एंगेज झाल्यानंतर विक्रांतने मीडियाला एक स्टेटमेंट दिले आणि म्हणाला, “हो, आम्हा दोघांची एका छोट्या फंक्शनमध्ये एंगेजमेंट झाली. आम्ही लग्न आणि इतर सर्व गोष्टींबद्दल बोलू पण योग्य वेळ आल्यावर.” विशेष म्हणजे या दोघांची भेट ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल’ या मालिकेदरम्यान झाली होती.

हेही वाचा –

हेही पाहा-

हे देखील वाचा