Sunday, August 3, 2025
Home बॉलीवूड क्रूझ ड्रग्ज पार्टीत शाहरुख खानच्या मुलाला घेऊन जाणारा अरबाज मर्चंट आहे तरी कोण?

क्रूझ ड्रग्ज पार्टीत शाहरुख खानच्या मुलाला घेऊन जाणारा अरबाज मर्चंट आहे तरी कोण?

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) शनिवारी (२ ऑक्टोबर) मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझ शिपमधील ड्रग पार्टीचा भांडाफोड केला. या क्रूझ शिपमध्ये एनसीबी टीम प्रवासी म्हणून आली होती आणि त्यांनी या पार्टीवर छापा टाकला. या पार्टीला बॉलिवूड, फॅशन आणि व्यवसायिक लोक उपस्थित होते. त्यात बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानही होता.

या प्रकरणी एनसीबी पार्टीतील लोकांची तसेच आर्यन खानचीही चौकशी करत आहेत. या प्रकरणी आर्यन खानला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्यासोबत एकूण ८ नावे समोर आली आहेत. त्यांच्यामध्ये आर्यनचा चांगला मित्र आणि अभिनेता अरबाज मर्चंट आहे. त्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. एनसीबी आर्यन आणि अरबाजची चौकशी करून या पार्टीबद्दल जास्तीत जास्त माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे.

कोण आहे अरबाज मर्चंट?
अरबाजचे पूर्ण नाव अरबाज सेठ मर्चंट आहे. तो शाहरुख खानची मुलगी सुहानाचा खूप चांगला मित्र आहे. त्याने त्याचे इंस्टाग्राम अकाऊंट खासगी ठेवले आहे. जिथे ३० हजारांहून अधिक लोक त्याला फॉलो करतात. अरबाजला आर्यन खान, सुहाना खान, शनाया कपूर, अलाया फर्निचरवाला, अनन्या पांडे आणि अंजिनी धवनसारखे लोकप्रिय स्टारकिड्स इंस्टाग्रामवर फोलो करतात.

अरबाज मर्चंटचा जन्म ३० मे, १९९५ रोजी झाला होता. तो अभिनयात आपले नशीब आजमावत आहे आणि त्याची गणना इंस्टाग्राम स्टार म्हणून केली जाते. तो कायली जेनरशी लग्न करण्याच्या त्याच्या आशेबद्दल अनेकदा पोस्ट करतो आणि त्याच्या आवडत्या फुटबॉल स्टार्सबद्दल देखील पोस्ट करतो.

जुने फोटो झाले व्हायरल
अरबाज खानचे नाव समोर आल्यानंतर त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका फोटोमध्ये तो सुहाना खान आणि अनन्या पांडेसोबत दिसत आहे. हे फोटो एका पार्टी दरम्यानचे आहेत.

यांनाही घेतले ताब्यात
प्राथमिक माहितीनुसार, अरबाजने आर्यनला या पार्टीत आणले होते. आर्यन खान आणि अरबाज मर्चंटव्यतिरिक्त, मुनमुन धामिचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जसवाल, विक्रांत चोकर आणि गोमित चोप्रा यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-गर्ल गँगसोबत जंगलात फिरताना, नदीत डुबकी मारताना दिसली जान्हवी कपूर, व्हिडिओ आणि फोटो व्हायरल

-‘गोडसे’ वादाच्या भोवऱ्यात! ‘कोण आहेत महेश मांजरेकर?’, म्हणत गृहनिर्माण मंत्र्यांनी ओढले अस्तित्वावर ताशेरे

-मुंबई- दिल्ली संघातील सामन्याचा निकाल शरद केळकरच्या लागला जिव्हारी; फोटो पाहून तुम्हालाही कळेल त्याचं दु:ख

हे देखील वाचा