Wednesday, March 25, 2026
Home बॉलीवूड ईशा रिखी कोण आहे? बादशाह यांच्यासोबतच्या नात्यामुळे चर्चेत, ग्लॅमरमध्ये टॉप अभिनेत्रींनाही देते टक्कर

ईशा रिखी कोण आहे? बादशाह यांच्यासोबतच्या नात्यामुळे चर्चेत, ग्लॅमरमध्ये टॉप अभिनेत्रींनाही देते टक्कर

बादशाह हा बॉलीवूड चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय गायक, रॅपर आहे. तर तो कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असतो. मध्येच एका गाण्यामुळे वादात सापडला होता. पण ते प्रकरण आता शांत झाले आहे. पण सध्या तो आता त्याच्या एका वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आहे ते म्हणजे बादशाहच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर वेगाने पसरले आहेत. सुरुवातीला लोकांना वाटले की हे केवळ एक आभास आहे. पण नंतर गोष्टी स्पष्ट होऊ लागल्या आणि कुटुंबीयांच्या पोस्टमुळे हे फोटो खऱ्या लग्नाचेच असल्याचे निश्चित झाले.

आता प्रश्न असा निर्माण होतो की, बादशाहाने तो कोणाशी लग्न केले आहे? तर चला याबाबत जाणुन घेवुयात, 32 वर्षीय पंजाबी अभिनेत्री ईशा रिखीने 40 वर्षीय रॅपर बादशाहशी लग्न केले आहे. हे दोघे गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. तर नुकतेच एका खाजगी समारंभात त्यांनी लग्न केले आहे. मंगळवारी, त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. ईशा पंजाबी चित्रपटसृष्टीत एक सुप्रसिद्ध नाव असली तरी, तिने 2018 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे.

ईशा (isha)रिखीने ‘नवाबजादे’ या चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला आणि त्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला. पण वरुण धवन, श्रद्धा कपूर आणि आथिया शेट्टी यांंच्या चित्रपटातील ‘हाय रेटेड गबरू’ आणि ‘तेरे नाल नाचना’ यांसारख्या प्रमुख गाण्यांमध्ये दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

लोकप्रिय अभिनेत्री आणि मॉडेल हर्षिल कालियाचा भीषण अपघातामुळे मृत्यू

 

हे देखील वाचा