Thursday, March 26, 2026
Home बॉलीवूड क्रूझ रेव्ह पार्टीमध्ये, आर्यन खानसह सामील होणारी मुनमुन धामेचा नक्की आहे तरी कोण?

क्रूझ रेव्ह पार्टीमध्ये, आर्यन खानसह सामील होणारी मुनमुन धामेचा नक्की आहे तरी कोण?

अंमली पदार्थ घेतल्याच्या आरोपाखाली नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) रविवारी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केली. आर्यनसह, एनसीबीने आणखी ७ लोकांना अटक केली आहे. यापूर्वी एनसीबीने आर्यनसह केवळ अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांना अटक केली आहे. अरबाज हा आर्यनचा मित्र असल्याचे सांगितले जाते आणि असे म्हटले जाते की, त्याने आर्यनला क्रूझवर आणले. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, मुनमुन धामेचा नक्की आहे तरी कोण?

फॅशन मॉडेल आहे मुनमुन धामेचा
मुंबई राहणारी मुनमुन मुळची मध्यप्रदेशची आहे. तिचे वय २३ आहे. मुनमुनबद्दल बरेच तपशील उघड झाले नाहीत. परंतु असे समजले आहे की, ती मध्यप्रदेशातील एका मोठ्या व्यावसायिकाची मुलगी आहे. मुनमुन धामेचा एक फॅशन मॉडेल आहे. कदाचित मॉडेलिंगद्वारेच ती मोठ्या सेलिब्रिटींच्या संपर्कात आली असेल. सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटींसोबत मुनमुनचे फोटो आहेत.

कोणत्या सेलिब्रिटींसह आहेत मुनमुनचे फोटो?
मुनमुन सोशल मीडियावर सक्रिय आहे. ती आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. त्याचबरोबर मुनमुनने सोशल मीडियावर अनेक बॉलिवूड कलाकारांसोबत आपले फोटो शेअर केले आहेत. यामध्ये अर्जुन रामपाल, वरुण धवन, सुयश राय, निखिल चिनप्पा, गुरु रंधवा यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे.

एनसीबीला आधीच मिळाली होती माहिती
एनसीबीला कॉर्डेला द इंप्रेस क्रूझवर अंमली पदार्थाची पार्टी होण्याची माहिती आधीच मिळाली होती. त्यामुळे अधिकाऱ्यांनी क्रूझवर पूर्णपणे तयारी केली आणि छापा टाकला. त्या पार्टीत सुमारे ६०० लोक उपस्थित होते. त्यावेळी शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह ८ लोकांना ताब्यात घेण्यात आले, ज्यात ३ मुलींचा देखील समावेश आहे. या तीन मुलीमध्ये मुनमुन धामेचाही समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अंमली पदार्थ प्रकरणात आर्यन खानला अटक, किंग खानला भेटण्यासाठी भाईजान पोहोचला ‘मन्नत’ला

-दिशा पटानीने शेअर केला तिचा ‘असा’ दिलकश फोटो, अदा पाहून स्वत:ला रोखू शकला नाही टायगर श्रॉफ

-तेजस्विनी पंडितने सोशल मीडियावर शेअर केले तिचे वेगवेगळे मूड, फोटो पाहून स्वप्नील जोशी म्हणतोय…

हे देखील वाचा