Thursday, March 28, 2024

दिवसाढवळ्या निर्घृणपणे हत्या करण्यात आलेला सिद्धू मूसेवाला नक्की आहे तरी कोण?, घ्या जाणून

प्रसिद्ध पंजाबी गायक असणाऱ्या सिद्धू मूसेवालाची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आपल्या गाण्यांनी आणि पंजाबी रॅपने तुफान लोकप्रियता मिळवणाऱ्या सिद्धू मूसेवालाच्या हत्येचे कारण अदयाप समोर आले नाही. मात्र सिद्धू मूसेवालाच्या अशा क्रूर हत्येमुळे पंजाबी मनोरंजनविश्वासोबतच संपूर्ण देशातील लोकांना मोठा धक्का बसला आहे. सिद्धू मूसेवालाच्या चाहत्यांना देखील मोठ्या प्रमाणावर धक्का बसला आहे. अशी निर्घृण हत्या करण्यात आलेला सिद्धू मूसेवाला नक्की आहे तरी कोण? चला तर जाणून घेऊया.

तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेल्या सिद्धू मूसेवालाचा जन्म ११ जून १९९३ रोजी पंजाबच्या मनसा जिल्ह्यातल्या मुसा गावात एका पंजाबी कुटुंबात झाला. आपल्या गाण्यांनी स्वतःची वेगळी ओळख तयार करत तुफान प्रसिद्धी मिळवणाऱ्या सिद्धू मूसेवालाचे खरे नाव शुभदीप सिंह सिद्धू असे होते. प्राप्त माहितीनुसार सिद्धू मूसेवाला ज्या गावाचा होता त्याच गावाची त्याची आई सरपंच देखील होती. सिद्धू मूसेवाला त्याच्या प्रत्येक गाण्यात बंदुकाना हवेत हलवताना आणि मोठ्या गाड्या फिरवताना दिसायचा. यावरूनच लक्षात यायचे की, त्याला त्याच्या खऱ्या आयुष्यात या सर्व गोष्टींची किती हौस होती. मात्र यासर्व गोष्टींवरून सिद्धू मूसेवाला मोठ्या प्रमाणावर टीकेचा सामना करावा लागला. हिंसा आणि बंदुकाना गाण्यात दाखवणाऱ्या सिद्धू मूसेवालावर एफआयआर देखील दाखल करण्यात आली होती.

मेडियामधील रिपोर्ट्सनुसार सांगितले जाते की, देशात जेव्हा कोरोना काळ चालू होता तेव्हा याच काळात फायरिंग रेंजवर सिद्धू मूसेवालाला एके-47 बंदूक सोबत फायरिंग करताना पाहिले गेले होते. यासंबंधित अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते. यानंतर सिद्धू मूसेवालाचाय विरोधात केस देखील दाखल करण्यात आली होती. यासर्व प्रकरणानंतर सिद्धू मूसेवालाने आपल्या पुढच्या गाण्यात या सर्व गोष्टींचा उल्लेख त्याने केला होता. हे प्रकरण गाण्याच्या शुटिंगशी संबंधित होते.

सिद्धू मूसेवालाने त्याच्या महाविद्यालयीन जीवनातच पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीमध्ये जाण्यासाठी हळूहळू तयारी केली होती. या दरम्यान तो कॉलेजमध्ये गाण्याचा सराव देखील करायचा आणि सोबतच गाण्यांची शूटिंग देखील करायचा. सिद्धू मूसेवालाचे रॅप आणि त्याचा अंदाज सर्वच फॅन्सला तुफान भावला.

वाचून आश्चर्य वाटेल मात्र सिद्धू मूसेवालाने त्याचे करिअर गायक म्हणून नाही तर गीतकार म्हणून सुरु केले. ‘लाइसेंस’ या पंजाबी गाण्याचे शब्द सिद्धू मूसेवालाने लिहिले होते. हे गाणे पंजाबी गायक निंजाने गायले. यानंतर सिद्धू मूसेवालाने पहिल्यांदा ‘जी वेगन’ हे गाणे गात तो लोकांच्या समोर आला. मात्र त्याला खरी प्रसिद्धी आणि ओळख दिली ती ‘सो हाय’ या गाण्याने. सिद्धू मूसेवालाच्या या गाण्याला संपूर्ण जगात तुफान प्रतिसाद मिळाला. त्यानंतर तो एका रात्रीत स्टार झाला. याच गाण्याला यूटुबवर ४७७ मिलियन व्ह्यूज मिळाले आहे.

सिद्धू मूसेवालाच्या हटके आणि अनोख्या गायकीचे संपूर्ण देशात आणि जगात लोकांनी खूपच कौतुक केले. त्याचे सुपरहिट गाणे एके-47 उके एकल चार्टमधे सामील झाले होते. तर दुसरीकडे २०२० वर्षात ‘द गार्जियन यांच्याकडून ५० लेटेस्ट कलाकारांची यादी आली त्यात सिद्धू मूसेवालाचे नाव होते. सिद्धू मूसेवालाने लुधियानाच्या गुरु नानक देव इंजिनियरिंग कॉलेजमधून इंजिनीरिंगचे शिक्षण घेतले.

सिद्धू मूसेवाला राजकारणात देखील खूपच सक्रिय होता. त्याने २०२१ साली पंजाबच्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याने राहुल गांधी यांची भेट देखील घेतली ज्याची तुफान चर्चा देखील झाली होती. या निवडणुकीमध्ये त्याने काँग्रेसकडून निवडणूक देखील लढवली. ज्यात तो हरला. एक दिवस आधीच सिद्धू मूसेवालाची सुरक्षा काढण्यात आली होती. यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी त्याच्यावर हल्ला झाला आणि त्याच्या मृत्यू झाला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

सिनेसृष्टी पुन्हा शोक सागरात, भरदिवसा ‘या’ प्रसिद्ध मॉडेलने घेतला गळफास

कल्पनेपलीकडील वास्तवाची गोष्ट सांगणाऱ्या ‘वाय’ चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

विराट कोहली जेव्हा अनुष्का शर्मासाठी सार्वजनिक ठिकाणी पोहोचला होता बेकरीत, तेव्हा घडलं असं काही 

हे देखील वाचा