सोशल मीडिया हे असे माध्यम आहे जिथे प्रत्येक व्यक्ती आपल्यामधील कलागुणांना सर्वांसमोर आणू शकतो. इथे स्वतःच्या मनाचे राज्य असते. कला, संगीत, नृत्य अशा वेगवेगळ्या गुणांनी परिपूर्ण असलेल्या अनेक व्यक्ती सहज सोशल मिडियावर दिसतात. अशात काही दिवसांपूर्वी ‘बचपन का प्यार’ हे गाणं सोशल मिडियावर चांगलंच गाजलं होतं. सहदेवच्या आवाजातील या गाण्याला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळाली. तसेच या गाण्यामुळे सहदेवच्या आयुष्याची नौका सोशल मीडियावर चांगलीच पळाली. अशात आता ‘मनिके मागे हिते’ हे गाणं देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. इंस्टाग्रामवर सध्या प्रत्येक जण या गाण्यावर रील्स बनवत आहेत. या गाण्याचा एक ही शब्द भारतीयांना समजत नसला, तरी प्रत्येकाला हे गाणं ऐकण्याचा मोह काही आवरत नाही आहे. चला, तर मग जाणून घेऊयात हे गाणं नेमकं कुठलं आणि कुणी गायलंय.
श्रीलंकेतील योहानी नावाच्या एका मुलीने हे गाणं गायलं आहे. सोशल मीडियामध्ये फक्त इंस्टाग्राम नाही, तर फेसबूक, ट्विटर या सर्व माध्यमांवर हे गाणं व्हायरल होताना दिसत आहे. गाण्याचे बोल ऐकून तुम्हाला वाटत असेल की, हे गाणं तामिळ किंवा मल्याळम भाषेतील आहे. परंतु हे गाणं तामिळ किंवा मल्याळम नाही, तर सिंहला भाषेतील आहे. या गाण्याने श्रीलंकेपासून ते भारतापर्यंत सर्वांनाच भुरळ घातली आहे. योहानीच्या या गाण्याने प्रत्येकजण आज तिला ओळखत आहे. तिच्या या गाण्याचे चाहत्यांना इतके वेड लागले आहे की, अनेकांनी तिला हे गाणं तामिळ आणि मल्याळम भाषेत गाण्याची विनंती केली. त्यांनतर तिने तामिळ आणि मल्याळम या भाषांमध्ये देखील हे गाणे गायले असून, ते २६ जुलैला चाहत्यांच्या भेटीला आले. योहानीचे ओरिजनल सिंहला भाषेतील हे गाणे (मे २०२१)मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आले होते.
बिग बींनाही आवरला नाही ‘मनिके मागे हिते’ गाण्याचा मोह
योहानीच्या गाण्याने सर्वसामान्यांनाच नाही, तर मोठं मोठ्या कलाकारांना देखील तिच्या आवाजाने वेड लावले आहे. अमिताभ बच्चन यांनी आपल्या एका गाण्याच्या व्हिडिओवर ‘मनिके मागे हिते’ हे गाणं बॅकग्राऊंडला लावून तो व्हिडीओ सोशल मिडियावर शेअर केला. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “काय केलं आणि काय झालं, पण खरंच खूप छान आहे हे गाणं. ‘मनिके मागे हिते’ माझ्या कालियाच्या या गाण्याला जीनियस नव्या नवेलीने एडिट केले आहे. परंतु इमानदारीने सांगतो ‘मनिके मागे हिते’ हेच गाणं मी रात्रभर ऐकत होतो. हे गाणं ऐकण्यापासून स्वतःला थांबवणं अशक्य आहे… खूपच छान.”
बरीच लोकप्रिय आहे योहानी
योहानीचे पूर्ण नाव योहानी दिलोका डिसिल्वा असे आहे. ती मूळची श्रीलंकेचीच. श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे ३० जुलै १९९३ रोजी तिचा जन्म झाला. तिने शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, ती लंडनला रवाना झाली. तिथे तिने लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट ऍंड प्रोफेशनल अकाउंट ही पदवी संपादन केली. तसेच शालेय शिक्षण घेताना ती एक उत्तम स्विमर आणि वॉटर पोलो प्लेयर देखील होती. पदवीचे शिक्षण घेतल्यांनंतर तिने एक गायिका म्हणूनच करिअर बनव्याचे ठरवले. तसेच स्वतःचे एक यूट्यूब चॅनल सुरु केले. ‘मनिके मागे हिते’ या गाण्याने ती आता खूप प्रसिद्ध झाली असून तिला श्रीलंकामध्ये ‘रैप प्रिन्सेस’ हा किताब देण्यात आला आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-TMKOC: जेठालाल झाला गंभीर जखमी, तर ‘यामुळे’ पोलिसांना करावी लागली गोकुळधाम सोसायटीच्या लोकांना अटक
-अरेरे! प्रार्थना अन् मायराच्या चेहऱ्याला नेमकं झालं तरी काय? नेटकऱ्यांचाही उमटतायेत प्रतिक्रिया
-‘मैं नहीं नाचती, मेरा दिल नाचता है…’, मस्तानी बनली मराठमोळी मानसी नाईक; पाहून पती म्हणतोय…