Friday, October 18, 2024
Home बॉलीवूड फोटोमधील चिमुकल्याला ओळखलं का? गोड स्माईलने लावू शकता अंदाज

फोटोमधील चिमुकल्याला ओळखलं का? गोड स्माईलने लावू शकता अंदाज

चाहते आपल्या आवडत्या कलाकारांचे बालपणीचे फोटो पाहण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. कदाचित चित्रपटसृष्टीतील सर्वच नव्या-जुन्या अभिनेत्यांचे बालपणीचे फोटो पाहून अंदाज लावणे कठीण होते की ते कोण आहेत? काही कलाकारांमध्ये तरूण आणि म्हातारे झाल्यानंतरही काही विशेष बदल होत नाहीत, तर काहींमध्ये इतके बदल होतात की, त्यांना ओळखणे कठीण जाते. आज असाच एक फोटो तुमच्यासमोर शेअर करून आम्ही तुम्हाला या दिग्गज अभिनेत्याला ओळखण्याचे आव्हान देत आहोत. या अभिनेत्याने बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली होती.

एका फॅन पेजने या दिग्गज अभिनेत्याचा बालपणीचा फोटो आपल्या सोशल मीडिया पेजवर शेअर केला आहे. या मुलाचे हसणे पाहून तुम्हाला अंदाज येईलच, नाहीतर आम्ही खुलासा करतो. तुमच्या आवडत्या कलाकारांपैकी एकाचा न पाहिलेला फोटो आम्ही घेऊन आलो आहोत.

या थ्रोबॅक ब्लॅक अँड व्हाईट फोटोमध्ये बॉलिवूड दिग्गज ऋषी कपूर आहेत. ऋषी यांनी बालकलाकार म्हणून चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. ऋषी आता या जगात नाहीत, पण शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचं गोंडस हास्य त्यांच्यासोबत होतं. आपल्या हसण्याने लाखो मुलींच्या हृदयावर राज्य करणाऱ्या ऋषी कपूर यांनी ‘मेरा नाम जोकर’मध्ये बालकलाकार म्हणून काम केले होते. त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना १९७० मध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता.

ऋषी लहान असताना त्यांनी रोमँटिक चित्रपटांमध्ये काम केले आणि रुपेरी पडद्यावर अनेक प्रेमकथा गाजवल्या. माध्यमांतील वृत्तानुसार, १९७३ ते २००० दरम्यान ऋषी यांनी एक-दोन नव्हे, तर ९२ चित्रपटांमध्ये रोमँटिक हिरोची भूमिका साकारली होती. ऋषी कपूर यांची पत्नी नीतू सिंग देखील बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ऋषी आणि नीतू या जोडीने हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक यशस्वी चित्रपट दिले. आता त्यांचा मुलगा रणबीर कपूरही फिल्म इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्यांपैकी एक आहे. रणबीरही त्याच्या आई-वडिलांप्रमाणे अनेक चांगल्या चित्रपटांमध्ये काम करत आहे.

ऋषी हे एक उत्कृष्ट कलाकार होते ज्यांची चित्रपटसृष्टीतील सर्वांशी जवळची मैत्री होती. अतिशय मजेदार आणि जिवंत अभिनेत्याला २००८ मध्ये फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ३० एप्रिल २०२० रोजी सर्वांनीच सर्वांना रडवले, बॉलीवूडच्या चिंटूने जगाचा निरोप घेतला. ऋषी कपूर यांचे कर्करोगाने निधन झाले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम होता ऋषी कपूरचा चाहता, त्यांना ‘ही’ गोष्ट गिफ्ट करण्याची होती इच्छा

-काय सांगता! ऋषी कपूर स्वतःच्या लग्नात पडले होते बेशुद्ध, नीतू कपूर यांनी सांगितला मजेशीर किस्सा

-ऋषी कपूर करायचे राजेश खन्ना यांचा तिरस्कार; म्हणाले होते, ‘माझ्या हिरोईनला दूर केले आणि…’

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा